World Blood Donor Day: रक्तदान करण्यापूर्वी अन् केल्यानंतर अशी घ्या काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 12:01 PM2019-06-14T12:01:52+5:302019-06-14T12:06:57+5:30

रक्तदान हे श्रेष्ठदान असते, असे म्हटले जाते. मात्र, तरिही काही जण रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. त्यांच्या मनात अनेक शंका असतात. तज्ज्ञांच्या माहितीनुसार रक्तदान करण्याचे असंख्य आरोग्यदायी फायदे आहेत.

World blood donor day 2019 know what to do and what not before and after donating blood | World Blood Donor Day: रक्तदान करण्यापूर्वी अन् केल्यानंतर अशी घ्या काळजी!

World Blood Donor Day: रक्तदान करण्यापूर्वी अन् केल्यानंतर अशी घ्या काळजी!

googlenewsNext

(Image credit : EmoNews)

रक्तदान हे श्रेष्ठदान असते, असे म्हटले जाते. मात्र, तरिही काही जण रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. त्यांच्या मनात अनेक शंका असतात. तज्ज्ञांच्या माहितीनुसार रक्तदान करण्याचे असंख्य आरोग्यदायी फायदे आहेत. रक्तदान केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते, वजन नियंत्रणात राहत असून यांसारखे अनेक आरोग्यदायी फायदे होतात. एवढचं नाही तर, रक्तदान केल्याने फक्त शरीराचेच आरोग्य नाहीतर, मानसिक आरोग्यही उत्तम राहण्यास मदत होते. 

रक्तदान केल्याने आपण फक्त एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवतोच पण आपलं आरोग्यही सुधारत असतो. रक्तदान कसं करावं? किंवा रक्तदान केल्यानंतर काय करावं? यांसारख्या गोष्टींबाबत अनेकजणांना माहिती नसतं. त्यामुळे रक्तदानाबाबत जनजागृती होणं अत्यंत आवश्यत आहे. सध्या अनेक समाजसेवी संस्था, एनजीओ रक्तदानाबाबत जनजागृती करत असून अनेकांना रक्तदान करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. 

आज जागतिक रक्तदान दिवस असून दरवर्षी 14 जूनला वर्ल्ड ब्लड डोनर डे साजरा करण्यात येतो. हा दिवस ऑस्ट्रियाई जीवशास्त्रज्ञ कार्ल लेण्डस्टाइनर यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो. कार्ल यांनी रक्तातील ब्लड ग्रुपचे वर्गीकरण केलं होतं. आकड्यांनुसार, भारतामध्ये दरवर्षी एक कोटी ब्लड युनिटची गरज असते. त्यामुळे शक्य असेल तेव्हा रक्तदान करणं आवश्यक असतं. रक्तदान केल्याने फक्त हृदयासंबंधी आजारांचा धोका कमी होतो. 

परंतु तुम्हाला माहीत आहे का? रक्तदान करण्याआधी आणि केल्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक असतं. याबाबत सविस्त जाणून घेऊया...


सर्वात आधी रक्तदान करण्याआधी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात त्याबाबत...

- तुम्ही रक्तदान करणार असाल तर सर्वात आधी आपलं हेल्थ चेकअप आणि ब्लड टेस्ट करणं गरजेचं असतं. त्यामुळे हे समजण्यास मदत होते की, ब्लड हेल्दी आहे की नाही. तसेच तुमच्या ब्लडमधील हिमोग्लोबीनची लेवत कमीत कमी 12.5 टक्के एवढी असणं आवश्यक असतं. 

- लक्षात ठेवा की, हेल्दी आणि फिट व्यक्ती, ज्यांना कोणतंही इन्फेक्शन किंना संक्रमण झालेलं नसेल ती व्यक्ती रक्तदान करू शकतात. 18 ते 20 वयाचे तरूणही रक्तदान करू शकतात. रक्तदान करण्यासाठी तुमचं वजन कमीत कमी 50 किलो असणं गरजेचं आहे. 

(Image Credit : Awareness Days)

- जर हाय ब्लड प्रेशर, किडमी किंवा डायबिटीस किंवा एपिलेप्सी यांसारखे आजार असणाऱ्यांनी रक्तदान करू नये. 

- ज्या महिलांचं मिस्कॅरेज झालं आहे, त्यांनी 6 महिन्यांपर्यंत ब्लड डोनेट करू नये. 

- मागील एका महिन्यामध्ये जर तुम्ही कोणत्याही कारणासाठी लसीकरण केलं असेल तर रक्तदान करू नये. 

- जर तुम्ही मद्यसेवन केलं असेल तरिही 24 तासांपर्यंत रक्तदान करू शकत नाही. 

- मुबलक प्रमाणात आयर्न असणाऱ्या पदार्थांचे सेवन करा. मासे, बीन्स आणि पालक यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा. रक्तदान केल्यामुळे शरीरामध्ये आयर्नची कमतरता होते. आयर्न शरीरातील विविध भागांमध्ये ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करतं. शरीरामध्ये आयर्नच्या कमतरतेमुळे अशक्तपणा आणि चक्कर येते. याव्यतिरिक्त भरपूर प्रमाणात आहारात लिक्विडयुक्त पदार्थांचा समावेश करा. तसेच रक्तदान करण्याच्या एक दिवस अगोदर भरपूर झोप आणि विश्रांती घ्या. 

(Image Credit : Coming Holidays)

- आवळा, संत्री आणि लिंबू यांसारख्या व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचे सेवन करा. त्यामुळे आयर्न योग्य वेळी आणि पूर्णपणे शरीरामध्ये पोहोचू शकेल. जंक फूड, आइस्क्रिम्स आणि चॉकलेट्स यांसारख्या पदार्थांपासून दूर राहा. 

- तुम्ही कोणत्याही ब्लड कॅम्प किंवा हॉस्पिटलमध्ये जाणार असाल, तिथे रक्तदान करण्याआधी स्वच्छता आणि उपकरणांची स्वच्छता याकडे लक्ष द्या. रक्त घेण्यासाठी वापरण्यात येणारी सिरिंजही नवीन आहे याची खात्री करा. 

- रक्त घेताना डॉक्टर आणि स्टाफच्या हातांमध्ये ग्लव्स आहेत याची खात्री करून घ्या. 


रक्तदान केल्यानंतर अशी काळजी घ्या... 

- रेड क्रॉस ब्लडनुसार, ज्या ठिकाणावरून रक्त घेण्यात आलं आहे, त्याभागाला पाण्याच्या मदतीने व्यवस्थित स्वच्छ करा. 

- रक्तदान केल्यानंतर कमीत कमी अर्धा तास आराम करा आणि जास्त धावपळ किंवा एक्सरसाइज करणं टाळा. 

- रक्तदान केल्यानंतर लगेच गाडी चालवू नका. फ्रुट ज्यूस किंवा अशा पेय पदार्थांचा आहारात समावश करा, ज्यांमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असेल. यामुळे तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नॉर्मल राहण्यास मदत होते. 

- ब्लड डोनेट केल्यानंतर 8 तासांपर्यंत मद्यसेवन करणं टाळा. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता ही वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: World blood donor day 2019 know what to do and what not before and after donating blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.