World Blood Donor Day : रक्तदान करताय? 'या' गोष्टींची घ्या काळजी!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 10:29 AM2018-06-14T10:29:27+5:302018-06-14T10:29:36+5:30
आरोग्य चांगलं असलेले व्यक्ती प्रत्येक 3 महिन्याने रक्तदान करु शकतात. चला जाणून घेऊया याबाबत महत्वाच्या गोष्टी....
तसं तर कोणत्याही प्रकारचं दान हे श्रेष्ठ असतं, पण रक्तदान हे सर्वश्रेष्ठ आहे. या दानामुळे एका माणसाचा जीव वाचवला जाऊ शकतो. त्यामुळे सगळ्यांनी रक्तदान करायला हवं. आरोग्य चांगलं असलेले व्यक्ती प्रत्येक 3 महिन्याने रक्तदान करु शकतात. चला जाणून घेऊया याबाबत महत्वाच्या गोष्टी....
1) रक्तदान करतेवेळी तुमचं वय 18 ते 60 वर्ष दरम्यान असावं. आणि तुमचं वजन 45 किलोग्रॅमपेक्षा जास्त असावं.
2) तुम्हाला एचआयव्ही, हेपाटिटिस बी किंवा सी सारखे आजार असू नये.
3) रक्त ज्या जेथून काढलं जातं त्या जागेवर कोणताही निशान किंवा घाव असू नये.
4) हिसोग्लोबिन 12.5 पेक्षा अधिक असावा.
हेही आहे महत्वाचं
1) शरीराचे सगळी अंगे नियमित काम करत असावेत.
2) रक्त देण्याआधी पोटभर नाश्ता किंवा जेवळ केलेलं असावं. रक्तदान करण्यापूर्वी हलकं जेवण घ्यावं.
3) एक ग्लास पाणी पिऊन रक्तदान करावं आणि त्यानंतर हलकं काहीतरी खावं.
4) घाबरल्यासारखं किंवा चक्कर आल्यासारखं झाल्याल एक कप कॉफी घ्यावी आणि आराम करावा.
5) रक्तदान करण्याआधी धुम्रपान करु नये. रक्तदान केल्यावर तीन तासांनी धुम्रपान करु शकता.
6) जर 48 तासांपूर्वी तुम्ही अल्कोहोल सेवन केलं असेल तर रक्तान करु नये.
7) मासिक पाळी आली असल्यास महिलांनी रक्तदान करु नये.
या गोष्टींची घ्या काळजी
1) हिमोग्लोबिन 12.5 पेक्षा अधिक असावा.
2) वजन 45 किलो(महिला), 55 किलो(पुरुष)
3) रक्तदान केल्यानंतर पायी किंवा सायकल चालवत जाऊ नये. साधारण अर्धा तास कोणतही शारीरिक श्रम करु नये.