वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे 2019 : ब्रेन ट्यूमरची आहेत ही ७ लक्षणे, जाणून घ्या कशी कराल ओळख!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 10:20 AM2019-06-08T10:20:12+5:302019-06-08T10:22:54+5:30

वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे दरवर्षी ८ जूनला पाळला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश असतो लोकांमध्ये ब्रेन ट्यूमरबाबत जागरूकता निर्माण करणे.

World Brain Tumor Day 2019: Know the seven symptoms of brain tumors | वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे 2019 : ब्रेन ट्यूमरची आहेत ही ७ लक्षणे, जाणून घ्या कशी कराल ओळख!

वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे 2019 : ब्रेन ट्यूमरची आहेत ही ७ लक्षणे, जाणून घ्या कशी कराल ओळख!

googlenewsNext

वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे दरवर्षी ८ जूनला पाळला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश असतो लोकांमध्ये ब्रेन ट्यूमरबाबत जागरूकता निर्माण करणे. सामान्यपणे अनेक आजारांबाबत लोकांना माहिती असते. पण मेंदूच्या आजारांबाबत त्यांना आवश्यक ती माहिती नसते. ब्रेन ट्यूमर हा आजार आहे ज्याचा लोक अंदाजही लावू शकत नाहीत आणि जेव्हा माहिती होते तेव्हा फार उशीर झालेला असतो. अशात अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. आज आम्ही तुम्हाला वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे निमित्ताने या आजाराची काही लक्षणे सांगणार आहोत.

आकडेवारीवर नजर टाकली तर हे कळून येतं की, भारतात दरवर्षी ४० ते ५० हजार लोकांना ब्रेन ट्यूमरचं निदान होतं. यात सर्वात जास्त संख्या ही लहान मुलांची असते. लहान मुलांमध्ये ब्रेन ट्यूमर होण्याची टक्केवारी ही साधारण २० च्या वर आहे. एक्सपर्ट सांगतात की, ट्यूमरची लक्षणे ही तो कुठे आहे यावर निर्भर करतात. जर ट्यूमर तुमच्या डोळ्यांना आणि हात-पायांना कंट्रोल करणाऱ्या मेंदूच्या भागात असेल तर व्यक्तीच्या या अवयवांमध्ये कमजोरीची लक्षणे दिसू लागतात.

सतत डोकेदुख

सामान्यपणे असं मानलं जातं की, डोकेदुखी हे ट्यूमरचं सुरूवातीचं लक्षण असतं. पण ही सततची डोकेदुखी एखाद्या मोठ्या ट्यूमरदरम्यान होते. ही समस्या ट्यूमरच्या सुरूवातीच्या स्टेजमध्ये होत नाही. 

चालताना अचानक झटका लागणे

कोणत्याही प्रकारच्या ट्यूमरचं हे प्राथमिक लक्षण असतं. मेंदूमध्ये असलेल्या ट्यूमरमुळे न्यूरॉन्स अनियंत्रित होतात. यामुळे व्यक्तीची हालचाल असामान्य होऊ शकते. अशात संपूर्ण शरीरासोबतच एखाद्या अवयवात झटका येणे अशी समस्या होऊ शकते.

अचानक बॅलन्स बिघडणे

जर एखादी वस्तू निट उचलू शकत नसाल, पायऱ्या सहजपणे चढू शकत नसाल, तुमचा बॅलन्स बिघडत असेल. तर ही लक्षणे धोकादायक आबेत. बोलणं, गिळणं किंवा चेहऱ्याचे हावभाव कंट्रोल करून शकणं या गोष्टीही याचाच प्रकार आहेत.

एखादा अवयव सुन्न पडणं

जर तुमच्या शरीराचा एखाद अवयव किंवा चेहरा सुन्न पडला असेल किंवा तुम्हाला काहीच जाणवत नसेल तर याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. जेव्हा ट्यूमर ब्रेन स्टेममध्ये असतो, तेव्हा ही समस्या होते.

स्मरणशक्ती कमजोर होणे

ट्यूमरमुळे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वात बदल येतो. ज्या लोकांना ट्यूमर असतो, ते लोक गोष्टी विसरू लागतात. कन्फ्यूज असतात. त्यांना छोट्या छोट्या गोष्टी त्रासदायक करू लागतात. 

उलटीसारखं वाटणं

जर तुमचं पोट खराब असेल आणि तुला उलटी येत असल्यासारखं वाटत असेल तर चिंतेची बाब असू शकते. हे सतत होत असेल तर फार चिंतेची बाब आहे. याचं काही कारण लक्षात येत नसेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डोळ्यांसमोर अंधारी येणे

कधी कधी धुसर दिसणे, दोन गोष्टी दिसणे किंवा एकाएकी डोळ्यांची दृष्टी काही वेळासाठी दूर होणे हे ट्यूमरचं लक्षण आहे. अशात तुम्हाला तरगंते चिन्हेही दिसू शकतात.

Web Title: World Brain Tumor Day 2019: Know the seven symptoms of brain tumors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.