ब्रेन ट्यूमरचा सर्वाधिक धोका कोणाला?; जाणून घ्या, होण्यामागचं कारण, 'ही' आहेत लक्षणं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 12:50 PM2024-06-08T12:50:26+5:302024-06-08T12:51:51+5:30
World Brain Tumour Day 2024: दरवर्षी जगभरात १० लाखांहून अधिक लोक ब्रेन ट्यूमरसारख्या आजारांना बळी पडत आहेत. दरवर्षी सुमारे ९० हजार लोकांना याचं निदान होतं. मुलांमध्येही त्याचा धोका झपाट्याने वाढला आहे.
आजकाल ब्रेन ट्युमरच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. विशेषतः तरुणाई या आजाराला बळी पडत आहे. ब्रेन ट्यूमर म्हणजे नेमकं काय? ब्रेन ट्यूमरमध्ये मेंदूच्या सभोवतालच्या सेल्स अनियंत्रितपणे वाढू लागतात. कधीकधी ते इतके पसरतात की ते मेंदूपासून शरीराच्या इतर भागांमध्ये देखील पसरू लागतात. मेंदूच्या आजूबाजूच्या सेल्स आणि डीएनएमध्ये अनेक धोकादायक बदलांमुळे ब्रेन ट्यूमरचा धोका वाढतो.
'अमेरिकन ब्रेन ट्यूमर असोसिएशन'च्या रिपोर्टनुसार, दरवर्षी जगभरात १० लाखांहून अधिक लोक ब्रेन ट्यूमरसारख्या आजारांना बळी पडत आहेत. दरवर्षी सुमारे ९० हजार लोकांना याचं निदान होतं. मुलांमध्येही त्याचा धोका झपाट्याने वाढला आहे. ब्रेन ट्यूमरबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी ८ जून रोजी जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस साजरा केला जातो. त्याची सुरुवातीची लक्षणं समजणं फार कठीण आहे. पण वेळीच समजली तर जीव वाचू शकतो.
ब्रेन ट्यूमर होण्यामागचं कारण
ब्रेन ट्यूमर म्हणजेच मेंदूभोवती सेल्सची अनियंत्रित वाढ किंवा डीएनएमध्ये होणारे बदल. हे खराब आहार, जीवनशैली आणि अनुवांशिक कारणांमुळे देखील होऊ शकतं. त्याच वेळी, हे विशिष्ट प्रकारचं रसायन आणि रेडिएशनच्या संपर्कात आल्यामुळे देखील असू शकतं. त्याची लक्षणे वेळीच ओळखणं फार महत्त्वाचं आहे.
ब्रेन ट्यूमरची लक्षणं
- डोकेदुखी किंवा सकाळी अचानक तीव्र वेदना होणं
- मळमळ किंवा उलट्या
- डोळ्यांच्या समस्या किंवा दृष्टी खराब होणे
- हात किंवा पायांना मुंग्या येणे
- बोलण्यात अडचण येत आहे
- संपूर्ण दिवस थकवा जाणवणं
- काहीही गोष्टी लक्षात ठेवण्यास त्रास होतो.
ब्रेन ट्यूमरच्या वेळी शरीरात होतात बदल
लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांना ब्रेन ट्यूमरचा धोका असतो. ब्रेन ट्यूमरमुळे मेंदू आणि शरीरात अनेक बदल होतात, त्याचा परिणाम डोळ्यांवरही होतो. हे ऑप्टिक मज्जातंतूवर जास्तीत जास्त दबाव टाकतं, ज्यामुळे दृष्टी धूसर होऊ शकते आणि अंधत्व येऊ शकते. आरोग्यविषयक काही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.