World Cancer Day 2021: तंबाखू खात नसाल तरीही 'या' ५ कारणांमळे होऊ शकतो तोंडाचा कॅन्सर, वेळीच सावध व्हा

By Manali.bagul | Published: February 4, 2021 12:05 PM2021-02-04T12:05:30+5:302021-02-04T12:13:03+5:30

World Cancer Day 2021: अनेकदा असं  होतं की व्यक्तीनं कधीही आयुष्यात सिगारेट, दारू किंवा बीडीचे सेवन केलेलं नसतं पण तरीही त्याला कॅन्सर होतो. असं का होतं? तंबाखू व्यतिरिक्त तोंडाच्या कॅन्सरची कारणं काय आहेत

World Cancer Day 2021: 5 causes of oral cancer other than tobacco | World Cancer Day 2021: तंबाखू खात नसाल तरीही 'या' ५ कारणांमळे होऊ शकतो तोंडाचा कॅन्सर, वेळीच सावध व्हा

World Cancer Day 2021: तंबाखू खात नसाल तरीही 'या' ५ कारणांमळे होऊ शकतो तोंडाचा कॅन्सर, वेळीच सावध व्हा

googlenewsNext

तुम्ही तंबाखू किंवा सिगारेटचे सेवन करत नसाल तर तुम्हाला कॅन्सरचा (Cancer) धोका उद्भवणार नाही असं वाटत असेल तर तुमचा खूप मोठा गैरसमज होऊ शकतो. तंबाखूचे सेवन कॅन्सरच्या प्रसाराचे सगळ्यात मोठे कारण आहे. याव्यतिरिक्त कॅन्सर अनेक कारणांमुळ होऊ शकतो. तोंडाचा कॅन्सर भारतातील सगळ्यात मोठा आजार असून दरवर्षी लाखो लोकांना या कारणामुळे आपला जीव गमवावा लागतो. अनेकदा असं  होतं की व्यक्तीनं कधीही आयुष्यात सिगारेट, दारू किंवा बीडीचे सेवन केलेलं नसतं पण तरीही त्याला कॅन्सर होतो. असं का होतं? तंबाखू व्यतिरिक्त तोंडाच्या कॅन्सरची कारणं काय आहेत. याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

जास्तवेळ उन्हात राहणं

सूर्यप्रकाश आरोग्यासाठी चांगला आहे, परंतु जास्त वेळ उन्हात राहिल्यास कॅन्सर देखील होतो. सूर्यामध्ये अतिनील किरण असतात, ज्यामुळे त्वचेचे नुकसान होते. त्वचेचा कर्करोग सहसा सूर्यप्रकाशामुळे होतो, परंतु काहीवेळा जबडाच्या हाडे आणि ओठांमुळेही कॅन्सर  होऊ शकतो. अल्ट्राव्हायोलेट किरण खूप हानिकारक असू शकतात आणि आरोग्यासाठी अनेक समस्या उद्भवण्याचा धोका असतो. अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे  ज्यामुळे जबड्याचा कॅन्सर होऊ शकतो. 

चुकीची जीवनशैली

आजकाल बाजारात अनेक भेसळयुक्त पदार्थ दिसून येतात. हळदी पावडर, काळीमिरी पावडर, धणे पावडर, तेल, तांदूळ या पदार्थांमध्ये भेसळ झाल्याचे अनेकदा समोर आलं आहे. जास्त नफ्याच्या हेतूने लोक वस्तूंमध्ये रासायनिक पदार्थ मिळतात. हे धोकादायक  रासायनिक पदार्थ कॅन्सरच्या पेशी वाढण्यास कारणीभूत ठरू शकतात. याव्यतिरिक्त आपण विचार करतो की फक्त फास्ट फूड खाल्यानं लठ्ठपणा येतो. पण  खराब तेलात तळलेले पदार्थ खाल्ल्यानंसुद्धा कॅन्सरचा सामना करावा लागू शकतो. 

दातांचे रोग

 तोंड व्यवस्थित साफ न केल्यामुळे किंवा तोंडाच्या संसर्गाने देखील कॅन्सर होऊ शकतो. दंत समस्यांमुळे जबड्याचा कॅन्सर होऊ शकतो. जर आपले दात किडले असती, दात तुटले असतील तर त्यांच्या संसर्गामुळे कर्करोग होऊ शकतो. म्हणून नेहमी दात स्वच्छ धुवा आणि काही अडचण असल्यास कृपया डेंटिस्टशी संपर्क साधा. 

वाढत्या वयात स्वतःला फिट ठेवण्यासाठी धर्मेंद्र करताहेत 'हे' काम; फक्त ३० मिनिटं द्यावी लागणार

एचपीव्हीची कारण

एचपीव्ही म्हणजेच ह्युमन पॅपिलोमाव्हायरस हा 200 पेक्षा जास्त विषाणूंचा समूह आहे जो असुरक्षित संभोग, स्पर्श, शिंका येणे आणि खोकल्याद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरतो. यातील बहुतेक व्हायरस कॅन्सरचा प्रसार करीत नाहीत, परंतु शास्त्रज्ञांनी सुमारे 12 व्हायरस 'उच्च जोखीम एचपीव्ही' म्हणून मानले आहेत. त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. 

कोरोनाचा असाही फायदा! पूर्णपणे नष्ट झाला आहे दरवर्षी लाखोंना त्रास देणारा हा आजार....

दारू पिणं

केवळ तंबाखू खाणेच नाही, मद्यपान केल्यानंही कॅन्सर होऊ शकतो. जे लोक जास्त मद्यपान करतात त्यांच्यात तोंडाच्या कॅन्सरचा धोका जास्त असतो. कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी मद्यपान सोडून देणं उत्तम ठरेल.

काय आहेत तोंडाच्या कॅन्सरची लक्षणे

१) कॅन्सरच्या सुरूवातीलाच तोंडाच्या आत पांढरी-लाल पुरळ किंवा छोट्या छोट्या जखमा होतात. यावर वेळीच लक्ष दिलं नाही तर पुढे जाऊन तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो. 

२) तोंडाची दुर्गंधी येणे, आवाजात बदल होणे, काही गिळण्यास त्रास होणे इत्यादी तोंडाच्या कॅन्सरची सामान्य लक्षणे आहेत. तोंडाचा कॅन्सर हा तोंडात कुठेही होऊ शकतो.

३) तोंडात जखम असलणे, सूज येणे, लाळेतून रक्त येणे, जळजळ होणे, तोंडात दुखणे इत्यादी गोष्टी तोंडाच्या कॅन्सरकडे इशारा करतात. 

४) तोंडाच्या आत कुठेही गाठ जाणवल्यास तोंडाच्या कॅन्सरचा संकेत असतो. त्यासोबतच तोंडात कोणतही रंग परिवर्तन झालं असेल तर वेळीच तपासणी करावी. 

धोका टाळण्यासाठी काय काळजी घ्याल

१) तोडांच्या कॅन्सरपासून बचाव करायचा असेल तर धुम्रपान, गुटखा, तंबाखू आणि नशेची सवय वेळीच सोडा.

२) दात आणि तोंडाची चांगल्याप्रकारे स्वच्छता करावी.

३) जंक फूड, प्रोसेस्ड फूड, कोल्ड ड्रिंक्स, पॅकेटचे पदार्थ कमी खावेत. तसेच वेगवेगळी फळे खावीत. 

४) तोंडात कोणत्याही प्रकारचा बदल दिसत असेल किंवा तोंडाला असलेली समस्या दूर होत नसेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(टिप : वरील सर्व उपाय आम्ही माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतं.)

Web Title: World Cancer Day 2021: 5 causes of oral cancer other than tobacco

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.