World Cancer Day : तुमच्या बोटांवर आहे का अशी खूण?; मग कॅन्सर होण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 03:48 PM2019-02-04T15:48:04+5:302019-02-04T15:48:58+5:30
स्किन कॅन्सर (Skin cancer)ला मेलानोमा (melanoma) कॅन्सर असंही म्हटलं जातं. जर तुमच्या त्वचेवर एखादी खूण किंवा तीळ असेल आणि ती हळूहळू मोठी होऊ लागली तर, हे स्किन कॅन्सरचे लक्षण असू शकते.
स्किन कॅन्सर (Skin cancer)ला मेलानोमा (melanoma) कॅन्सर असंही म्हटलं जातं. जर तुमच्या त्वचेवर एखादी खूण किंवा तीळ असेल आणि ती हळूहळू मोठी होऊ लागली तर, हे स्किन कॅन्सरचे लक्षण असू शकते. परंतु तुम्हाला माहीत आहे का? तुमच्या नखांवरूनही तुम्हाला स्किन कॅन्सर आहे की, नाही हे जाणून घेणं शक्य होतं. अनेक लोकांना या लक्षणांबाबत माहीत नाही. जाणून घेऊया नक्की काय आहेत ही लक्षणं...
आज जागतिक कर्करोग दिन (World Cancer Day) आहे. प्रत्येक वर्षाच्या 4 फेब्रुवारीला हा दिवस साजरा करण्यात येतो. यामागील मुख्य हेतू म्हणजे, कॅन्सरबाबत जागरूकता पसरवणं हाच असतो. जगभरात लोकांच्या मृत्यूचं प्रमुख कारण कॅन्सर ठरत आहे. याचाच अर्थ असा आहे की, प्रत्येक 6 मृत्यूंपैकी एका व्यक्तीचा मृत्यू हा कॅन्सरमुळे होतो.
'वर्ल्ड कॅन्सर डे'ची थीम (World Cancer Day theme)
2019मध्ये 'वर्ल्ड कॅन्सर डे'साठी 'मी आणि मी करू शकतो' (I Am and I Will) ही आहे. याचा अर्थ असा की, कोणत्याही व्यक्तीने ठरवलं तर कॅन्सरसारख्या रोगांशी लढून तो मूळापासून नष्ट करण्यासाठी मदत मिळते. जाणून घेऊया नखांवरून कॅन्सरच्या लक्षणांबाबत कसं जाणून घ्यावं त्याबाबत...
ब्यूटी टेक्नीशियन मॅनीकुरिस्ट जीन स्किनरने सर्वात आधी नखांच्या कलरवरून स्किन कॅन्सरच्या या विचित्र लक्षणाचा अनुभव घेतला आहे. 2017मध्ये त्याच्या नखांवर एक सरळ रेष तयार झाली होती. सुरुवातीला नखांवर आलेल्या या रेषेचं कारण कॅल्शिअमची कमतरता, ब्लड ब्लिस्टर किंवा काही जेनेटिक मार्क असावं, असं अंदाज वर्तवण्यात आला. परंतु त्यांना मेलेनोमाच्या लक्षणांबाबत माहीत होतं म्हणून त्यांनी या लक्षणांकडे दुर्लक्षं न करता डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य समजलं.
सबंगुअल मेलानोमा (Subungual melanoma) ची लक्षणं :
अमेरिकन अॅकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजी (एएडी) यांच्यानुसार, सबंगुअल मेलानोमा (Subungual melanoma) ला नेल मेलोनोमाच्या नावाने ओळखलं जातं. हा एक स्किन कॅन्सर असून जो नखांच्या आतमध्ये होतो. हा 0.7 ते 3.5 टक्के लोकांना होतो. या आजाराची लक्षणं ओळखणं फार कठिण आहे. परंतु हात किंवा पायांच्या नखांच्या खाली काळ्या किंवा पिवळसर रेष तयार झाली तर ही स्किन कॅन्सरची लक्षणं असू शकतात.
या गोष्टी लक्षात ठेवा
नखांच्या खाली काळ्या रंगाची रेष पडणं फक्त हेच स्किन कॅन्सरचं लक्षण नाही. तर नखांच्या आजूबाजूची त्वचा काळी पडणं, रक्त येणं, सतत नखं तुटणं इत्याही लक्षणंही आहेत.
सबंगुअल मेलानोमा (Subungual melanoma) वर उपचार
स्किन कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी प्राथमिक निदान महत्तवाचं ठरतं. त्यामुळे याप्रकारची कोणतीही लक्षणं दिसल्यावर डॉक्टरांचा लगेच सल्ला घ्या. खासकरून तुमच्या नखांच्या आजूबाजूला एखादी काळी रेष तयार होत असेल तर अजिबात दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेच आहे.