World Cancer Day : कॅन्सरची लक्षणं आधीच माहीत असतील तरच टाळता येईल मृत्यूचा धोका!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 10:19 AM2020-02-04T10:19:21+5:302020-02-04T10:32:57+5:30

आज म्हणजेच ४ फेब्रुवारीला दर वर्षी वर्ल्ड कॅन्सर डे असल्यामुळे आजाराबद्दल जनजागृती करण्यात येते.

World Cancer Day: Symptoms of cancer | World Cancer Day : कॅन्सरची लक्षणं आधीच माहीत असतील तरच टाळता येईल मृत्यूचा धोका!

World Cancer Day : कॅन्सरची लक्षणं आधीच माहीत असतील तरच टाळता येईल मृत्यूचा धोका!

Next

आज म्हणजेच ४ फेब्रुवारीला दर वर्षी वर्ल्ड कॅन्सर असल्यामुळे या आजाराबद्दल  जनजागृती करण्यात येते. आपण सध्याच्या काळात बघतो की लहान मोठ्या आजारांचे मोठ्या आजारात रुपांतर होतं असतं. कॅन्सरच्या आजाराचे रुग्ण भारतात दिवसेंदिवस वाढत जात आहेत.  नॅशनल हेल्थ  प्रोफाईल  २०१९ च्या आकडेवारीनुसार  भारतात २०१७ ते २०१८ च्या मध्ये कॅन्सरच्या रूग्णांची संख्या  ३२४ टक्क्यांनी वाढली आहे.

नॅशनल कॅन्सर रेजेस्ट्री प्रोग्रामनुसार  भारतात दर दिवशी  कॅन्सरचा आजार झाल्यामुळे  १३०० लोकांना मृत्यू होतो.  आज आम्ही तुम्हाला कॅन्सर जर झाला असेल तर कोणती लक्षणं दिसून येतात हे सांगणार आहोत.

मुत्राद्वारे किंवा मलाद्वारे रक्त बाहेर येणे

अनेकदा किडनी स्टोनचा आजार झाल्यानंतर सुद्धा लघवी करत असताना रक्त बाहेर येत असतं.    जर तुम्हाला असा त्रास कधीही उद्भवल्यास डॉक्टरांच सल्ला घ्या. कारण असा त्रास होणे हे कॅन्सर असण्याचं लक्षण आहे.  याशिवाय अनेकदा तुम्हाला डायरिया सुद्धा होण्याचा धोका असतो. तुम्हाला या त्रासाला सामोरे जावे लागत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा. आणि रक्त तपासणी करून घ्या.

अचानक वजन कमी होणे

जर तुमचं वजन अचानक मोठ्या फरकाने कमी होत असेल तर कॅन्सर असू शकतो.  या समस्येकडे जर तुम्ही दूर्लक्ष कराल महागात सुद्धा पडू शकतं. साधारणपणे २ ते ३ महिन्यात एखाद्या व्यक्तीचं ८ ते १० किलो वजन कमी झालं तर लंग्ज कॅन्सर असू शकतो. त्यासाठी आधीच तपासणी करणं गरजेचं आहे. 


शरीरात गाठी तयार होणे

तुमच्या शरीरातील प्रत्येक गाठ ही कॅन्सरचीच असेल असं नाही. पण जर तुमच्या शरीरातील एखाद्या भागावर गाठ झाली असेल आणि तीचा आकार दिवसेंदिवस वाढत जात असेल तर  कॅन्सरची  तपासणी आवश्य करा. ( हे पण वाचा-गुलाबाच्या सुगंधाने मिळवा चांगली झोप आणि तल्लख बुद्धी, जाणून घ्या काय सांगतो रिसर्च)


 छातीत बदल

ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांनाच नाही तर पुरूषांना सुद्धा असतो. पण तुम्हाला माहीत आहे का जागातील सगळ्यात जास्त कॉमन दिसून येत असलेल्या कॅन्सरच्या प्रकारात ब्रेस्ट कॅन्सरचा धोका असतो. तर निप्पल्सना सूज येत असेल किंवा छातीला खाज येत असेल तर  तपासणी करून घ्या. कारण दुर्लक्ष केल्यास या आजारांचा धोका जास्त वाढण्याची शक्यता असते. तसचं एखाद्या व्यक्तीला ताप आला असेल आणि अनेक उपचार करून सुद्धा त्याला बरं वाटत नसेल तर  त्वरीत डॉक्टारांशी संर्पक साधा. 

अंगदुखी

सध्याच्या धावपळी्च्या जगात प्रत्येकालाच थकवा येत असतो. खाण्यापिण्याकडे होत असलेलं दुर्लक्ष आणि अपुरी झोप यांमुळे शरीरात नेहमी रक्ताची कमतरता जाणवत असते. सर्वाधिक वेळ तुम्हाला अंगदुखीचा, डोकेदुखीचा आणि कंबरदुखीचा त्रास होत असेल तर दुर्लक्ष  करणं महागात पडू शकतं. कारण या लक्षणामुळे  कॅन्सरचा धोका उद्भवण्याची शक्यता असते.  खोकल्यानंतर त्यातून रक्त बाहेर पडणं हा प्रकार सुद्धा जीवघेण्या आजाराचं कारण ठरू शकतो. 

मासिक पाळी व्यतिरिक्त  रक्तस्त्राव

महिलांना जर मासिक पाळी नसताना सुद्धा  योनी मार्गातून रक्तस्त्राव होत असेल. तर कॅन्सरच्या आजाराचं लक्षण आहे. तसचं या कालावधीत पाठदुखी, कंबरदुखीची समस्या उद्भवते.  तुम्हालाही  हा त्रास जाणवला तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क करून योग्य ते उपचार घ्या. ( हे पण वाचा-प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटॅमिन्सचा खजिना आहेत शेवग्याच्या शेंगा, कधी औषध घेण्याची पडणार नाही गरज!)

Web Title: World Cancer Day: Symptoms of cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.