कमी काम करून जास्त थकवा येतो? मग क्रोनिक फटीग सिंड्रोमचे असू शकता शिकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 02:59 PM2020-05-12T14:59:08+5:302020-05-12T15:04:00+5:30
शारीरिक आणि मानसिक स्वरुपात एखादी व्यक्ती कमकुवत होत असते.
(Image credit- medical news today, men's divorse)
सध्या बदलत्या जीवनशैलीत अनेक गंभीर आजारांचा सामना सगळ्या वयोगटातील लोकांना करावा लागतो. १२ मे ला वर्ल्ड क्रोनिक फटीग सिंड्रोम अवेयरनेस डे साजरा केला जातो. कारण याच दिवशी फ्लोरेंस नाइटेंगल यांचा जन्म दिवस असतो. महिलांमध्ये तसंच पुरुषांमध्ये क्रोनिक फटीग सिंड्रोम हा आजार मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. या समस्येला फाइब्रोमिल्गिया असं सुद्धा म्हटलं जातं. या आजारात व्यक्तीला खूप थकवा जाणवतो. थकवा येण्याचे काही खास कारण नसतं. पण शारीरिक आणि मानसिक स्वरुपात एखादी व्यक्ती कमकुवत होत असते. ही समस्या ताण-तणावासंबंधी असते.
लक्षणं
काम केल्यानंतर जास्त थकवा येणं, स्मरणशक्ती कमकुवत होणं, कोणत्याही कामावर लक्षं न देणं, सांधेदुखी, तीव्र डोकेदुखीच्या वेदना, झोपेतून उठल्यानंतर किंवा झोपायच्या आधी थकवा येणं ही आहेत. या आजारात प्रकृतीला कोणताही गंभीर स्वरुपाचा धोका उद्भवत नाही.
थकवा आल्यामुळे लहान मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे आत्मविश्वासाची कमतरता जाणवते. या आजारानेग्रस्त असलेले लोक एकमेकांमध्ये जास्त मिसळत नाही. त्यामुळे डिप्रेशनचं शिकार व्हावं लागतं. या आजाराचा परिणाम व्यक्तीच्या प्रोफेशनल जीवनावर होत असतो. (CoronaVirus News : कफ सिरप घेतल्याने कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका जास्त, वाचा रिसर्च)
या आजाराचे कोणतेही खास कारण नाही. पण शरीरातील हार्मोन्सचं संतुलन बिघडत असल्यामुळे अशा समस्या उद्भवतात. परिणामी रोगप्रतिकारकशक्ती कमी होते.व्हायरल संक्रमणाचं शिकार सुद्धा लोक होतात. जर जास्त थकवा येत असेल तर वेळ न घालवता त्वरीत तपासणी करणं गरजेचं आहे. औषधं, थेरेपी आणि सायकोलॉजीकल ट्रिटमेंटद्वारे हे आजार बरे केले जाऊ शकतात.
(शरीरातील विषारी पदार्थ बाहेर न पडल्याने उद्भवू शकतात 'या' गंभीर समस्या, जाणून घ्या लक्षणं)