रात्री दिसतात डायबिटीसची ही 6 लक्षणं, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 10:08 AM2023-11-14T10:08:44+5:302023-11-14T10:09:33+5:30

World Diabetes Day : आज आम्ही तुम्हाला डायबिटीसचे रात्री दिसणारे काही लक्षणं सांगणार आहोत.

World Diabetes Day : 6 common diabetes symptoms you can feel at night | रात्री दिसतात डायबिटीसची ही 6 लक्षणं, वेळीच व्हा सावध!

रात्री दिसतात डायबिटीसची ही 6 लक्षणं, वेळीच व्हा सावध!

World Diabetes Day : मधुमेह म्हणजेच डायबिटीस हा एक गंभीर आणि ठोस उपचार नसलेला एक आजार आहे. जो केवळ हेल्दी लाइफस्टाईल आणि हेल्दी डाएटच्या माध्यमातून कंट्रोल केला जाऊ शकतो. यात ब्लड शुगर कंट्रोल राहत नाही, ज्यामुळे तहान जास्त लागणे किंवा लघवी जास्त येणे, तोंड कोरडं पडणे, कमी दिसणे, थकवा आणि कमजोरी अशी गंभीर लक्षणं दिसतात.

डायबिटीस तेव्हा होतो जेव्हा शरीर पुरेसं इन्सुलिन तयार करत नाही. डायबिटीसचे दोन मुख्य प्रकार आहेत एक म्हणजे टाइप 1 आणि दुसरा म्हणजे टाइप 2 डायबिटीस.

डायबिटीस हा आजार केवळ वृद्धांनाच होतो असं नाही. तो कमी वयातही होऊ शकतो. डायबिटीसने पीडित लोकांना वेगवेगळी लक्षणं दिसू लागतात. आज आम्ही तुम्हाला डायबिटीसचे रात्री दिसणारे काही लक्षणं सांगणार आहोत.

पुन्हा पुन्हा लघवी लागणे

डायबिटीस असलेल्या लोकांना पुन्हा पुन्हा लघवी लागू शकते. ज्यात रात्री त्यांना ही समस्या अधिक होते. याचं कारण म्हणजे शरीर लघवीतून अतिरिक्त ग्लूकोजपासून सुटका मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

जास्त तहान लागणं

पुन्हा पुन्हा लघवी केल्याने शरीरातील पाणी कमी होऊ शकतं. ज्यामुळे तहान जास्त लागते. डायबिटीसच्या रूग्णांना पाणी पिण्यासाठी रात्री बेरात्री उठावं लागू शकतं.

रात्री घाम येणं

डायबिटीसच्या रूग्णांना रात्री घाम येऊ शकतो. रात्री झोपेत घाम येण्यासोबतच इतरही काही लक्षणं दिसू शकतात जसे की, थरथरी, हृदयाची धडधड वाढणे आणि भ्रम.

झोपमोड होणे

डायबिटीस असलेल्या लोकांना झोपण्यात समस्या होऊ शकते. हे वेगवेगळ्या कारणांनी होऊ शकतं. ज्यात डायबिटीस न्यूरोपॅथी (तंत्रिका क्षति), पुन्हा पुन्हा लघवी येणे आणि स्लीप एपनीयामुळे होणारी वेदना यांचा समावेश आहे.

रेस्टलेस लेग्स सिंड्रोम

डायबिटीसने पीडित लोकांमध्ये रेस्टलेस लेग्स सिंड्रोम असण्याचा धोका अधिक असतो. ही एक अशी स्थिती आहे ज्यामुळे पाय हलवण्याची तीव्र ईच्छा होते. खासकरून रात्री. यामुळे झोपणं आणि झोप येण्यात समस्या होते.

त्वचेवर खाज येणं

हाय ब्लड शुगर लेव्हलमुळे त्वचा कोरडी होते आणि त्वचेवर खाज येते. रात्रीच्या वेळी ही समस्या अधिक होऊ शकते. जर तुम्हाला यातील कोणतंही लक्षण दिसत असेल तर वेळीच डॉक्टरांना भेटा.

Web Title: World Diabetes Day : 6 common diabetes symptoms you can feel at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.