World Environment Day: पर्यावरण बिघडल्याने या आजारांचा करावा लागतो सामना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2018 10:28 AM2018-06-05T10:28:31+5:302018-06-05T10:28:31+5:30
प्लास्टिकपासून होणाऱ्या प्रदुषणामुळे श्वास घेण्यास त्रास होणे आणि त्वचेसंबंधी आजार होणे या समस्या होतात. चला जाणून घेऊया प्रदुषणामुळे काय मुख्य आजार होतात.
दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिवस (World Environment Day) साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश पर्यावरण सुरक्षेबाबत जनजागृती करणे हा आहे. हा दिवस पाळण्याची सुरुवात संयुक्त राष्ट्राने 1972 पासून केली होती. 5 जूनला पहिला पर्यावरण दिवस पाळला गेला होता. यावर्षीची थीम प्लास्टिकपासून होणाऱ्या प्रदुषणाला नष्ट करणे ही आहे. प्लास्टिकपासून होणाऱ्या प्रदुषणामुळे श्वास घेण्यास त्रास होणे आणि त्वचेसंबंधी आजार होणे या समस्या होतात. चला जाणून घेऊया प्रदुषणामुळे काय मुख्य आजार होतात.
1) फुफ्फुसाचा कॅन्सर
अलिकडे प्रदुषण इतकं वाढलंय की, विषारी धुरामुळे लोकांच्या फुफ्फुसांमध्ये विष भरलं जात आहे. आधी तर फुफ्फुसाचा कॅन्सर सिगारेटमुळे होत होता आणि आता वायु प्रदुषणामुळेही होऊ लागला आहे.
2) डोकेदुखी आणि थकवा
अलिकडे ध्वनी प्रदुषणही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे तुमच्या मेंदुतील सेल डॅमेज होतात आणि तुम्हाला थकवा जाणवायला लागतो.
3) ब्रोंकायटिस
ब्रोंकायटिस ही फुफ्फूसं आणि श्वासासंबंधीत एक समस्या आहे. ही समस्या केवळ प्रदुषणामुळेच होते.
4) अस्थमा
अस्थमा ही श्वासांसंबधी एक आजार असून याचा अटॅक तुम्ही प्रदुषणाच्या जाळ्यात अडकल्यावर येतो. आजकाल अस्थमा शाळेत जाणाऱ्या मुलांनाही होऊ लागला आहे.
5) पोटांचे आजार
अनेक दिवस विषारी पदार्थ आणि प्रदुषित पाणी प्यायल्याने तुम्हाला पोटांचे आजार व्हायला लागतात. हायब्रिड फळ-भाज्यांमुळे हे पोटांचे आजार होतात.
6) मेलानोमा
मेलानोमा हा त्वचेसंबंधी एक कॅन्सर आहे जो ओझोनच्या थेट संपर्कात राहिल्याने होतो. सध्या ओझोन लेअर फारच फाटली आहे आणि त्याचं कारण प्रदुषणच आहे.
7) जन्म दोष
जेव्हा तुमचा संपर्क वातावरणात पसरलेल्या विषारी तत्वांशी येतो, तेव्हा ते विषारी तत्व पोटातील गर्भालाही इजा पोहोचवतात. हे विषारी तत्व तुमच्या जीनमध्ये मिश्रित झाले आहेत.