जगातील पहिली कोरोना लस रशियाकडून लॉन्च; कोणाला, कधी, कुठे आणि किती दरात मिळणार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 04:58 PM2020-08-11T16:58:26+5:302020-08-11T17:13:21+5:30

Coronavirus: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आपल्या मुलीला या लसीचे डोस दिल्याची माहिती दिली. त्या दोघींची तब्येत पूर्णपणे बरी असून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम झाले नाहीत.

world first corona vaccine from Russia; Who will get it, when, where and at what rate? Find out | जगातील पहिली कोरोना लस रशियाकडून लॉन्च; कोणाला, कधी, कुठे आणि किती दरात मिळणार? जाणून घ्या

जगातील पहिली कोरोना लस रशियाकडून लॉन्च; कोणाला, कधी, कुठे आणि किती दरात मिळणार? जाणून घ्या

googlenewsNext

कोरोनाच्या लढाईत रशियाने संपूर्ण जगाला मागे टाकले आहे. जगातील पहिली कोरोना विषाणूची लस मंजूर झाली आहे. मंगळवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी याची घोषणा केली. ते म्हणाले की, रशियामध्ये बनविलेल्या पहिल्या कोविड -१९ लसीला आरोग्य मंत्रालयाकडून मान्यता मिळाली आहे. माझ्या मुलींना ही लस टोचल्याची माहिती पुतीन यांनी दिली. आज सकाळी जगात पहिल्यांदाच नवीन कोरोना विषाणूविरूद्ध लस नोंदविण्यात आली. या लसीवर काम केलेल्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. ही लस सर्व महत्त्वपूर्ण चाचण्यांमध्ये पार पडली आहे. आता ही लस मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी पाठविली जाईल.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आपल्या मुलीला या लसीचे डोस दिल्याची माहिती दिली. त्या दोघींची तब्येत पूर्णपणे बरी असून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम झाले नाहीत.

सर्वात आधी लसीचा डोस कोणाला मिळणार?

रशियन आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांच्या म्हणण्यानुसार, या महिन्यात आरोग्य कर्मचार्‍यांना लस देण्याचं काम सुरु केले जाईल. रशियामध्ये, प्रथम आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोनाची लस दिली जाईल. यानंतर ज्येष्ठ नागरिकांना ही लस दिली जाईल.

ही लस बाजारात कधी येईल?

सध्या या लसीची मर्यादित डोस तयार करण्यात आले आहेत. नियामक मान्यता प्राप्त झाली आहे, म्हणून आता या लसीचे औद्योगिक उत्पादन सप्टेंबरपासून सुरू होऊ शकेल. ऑक्टोबरपासून ते देशभर लसीकरण सुरू करता येऊ शकेल असं रशियानं म्हटले आहे.

जगात सर्वप्रथम ही लस कोणाला मिळणार?

रशियाने जगभरात लस पुरविण्याविषयी सांगितले आहे, परंतु बरेच देश अजूनही याबद्दल संकोच करत आहेत. पाश्चात्य देशांसह जागतिक आरोग्य संघटनेनेही चिंता व्यक्त केली आहे. पुरेशा डेटाशिवाय लस पुरवठा करणे योग्य होणार नाही. युनायटेड किंगडमने स्पष्टपणे सांगितले आहे की, ते आपल्या नागरिकांना रशियन लस डोस देणार नाही. अशा परिस्थितीत, लस सुरुवातीच्या काळात इतर देशांमध्ये पाठविली जाऊ शकत नाही. रशियाच्या सर्वसामान्य जनतेवर लसीचा काय परिणाम होतोय यावरुन इतर देश निर्णय घेऊ शकतात.

NBT

या लसीसाठी किती खर्च येईल?

टीएएसएस या रशियन एजन्सीच्या म्हणण्यानुसार ही लस रशियामध्ये 'विनाशुल्क' उपलब्ध होईल. यावरील खर्च देशाच्या अर्थसंकल्पातून दिला जाईल. उर्वरित देशांची किंमत अद्याप जाहीर केलेली नाही.

संशोधकांनी स्वत: ची लस टोचली आहे.

मॉस्कोच्या गामलेया संशोधन संस्थेने एडेनोव्हायरस बेस करून ही लस विकसित केली आहे. संशोधकांचा असा दावा आहे की, या लसीमध्ये वापरलेले कण स्वत:ला रेप्लिकेट करु शकत नाहीत. संशोधन आणि उत्पादनात गुंतलेल्या बर्‍याच लोकांनी स्वत: ला या लसीचा डोस दिला आहे. काही लोकांना डोस दिल्यानंतर ताप आला, परंतु त्या लोकांना पॅरासिटामोल औषधाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.

NBT

अद्याप जगभरात कोरोना लसीची चाचणी सुरु आहे

रशियाने लस लॉन्च केली आहे, तर उर्वरित जग सध्या कोरोना लसींची चाचणी करीत आहे. यूएसए, यूके, इस्त्राईल, जपान, चीन भारत यासह अनेक देशांमध्ये लसीची क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत. चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात एकूण ५ लसी पोहोचल्या असून ऑक्टोबरपर्यंत प्राथमिक निकाल अपेक्षित आहे.

रशियामध्ये लसीला विरोध

लस लॉन्च करण्याच्या बाबतीत रशियाने दाखवलेली 'घाई' जगाला पटली नाही. या आठवड्यापासून ही लस नागरिकांना दिली जाईल, परंतु त्यास विरोध आहे. मल्टीनेशनल फार्मा कंपन्यांच्या स्थानिक संघटनेने इशारा दिला आहे की, क्लिनिकल चाचण्या पूर्ण केल्याशिवाय लस नागरी वापरास परवानगी देणे हे एक धोकादायक पाऊल असू शकते. क्लिनिकल ट्रायल्स ऑर्गनायझेशन असोसिएशनने आरोग्य मंत्री मिखाईल मुराश्को यांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, आतापर्यंत १०० पेक्षा कमी लोकांना डोस देण्यात आले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याचा वापर धोकादायक ठरू शकतो.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

जगातील पहिली कोरोना लस बनवली; रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांची घोषणा

पोलीस उपनिरीक्षकानं लॉकडाऊनमध्ये लग्न केलं अन् होम क्वारंटाईनमध्ये स्वत:वर गोळी झाडली

सेक्स न करण्याची पत्नीने घेतली शपथ; नैराश्येत पतीने गळफास घेऊन केली आत्महत्या

 

१ सप्टेंबरपासून शाळा सुरु होण्याची शक्यता धूसर; कोरोनाच्या धास्तीनं ऑनलाईन शिक्षणावरच भर

सीबीआय चौकशी करायची असेल तर गोपीनाथ मुंडे आणि न्या. लोया यांचीही करा; शिवसेनेची मागणी

Web Title: world first corona vaccine from Russia; Who will get it, when, where and at what rate? Find out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.