जबरदस्त! वजन कमी करण्यासाठी चुंबकाचा खास जुगाड, दोन आठवड्यात ६ किलो वजन होतं कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 04:04 PM2021-06-29T16:04:43+5:302021-06-29T16:08:02+5:30

Device Dental Slim Diet Control : एकप्रकारे असं म्हणता येईल की, याने व्यक्तीचं तोंड पूर्णपणे लॉक होतं. असं सांगितलं जात आहे की, हे अशाप्रकारचं जगातलं पहिलंच उपकरण आहे.

World first weight loss device dental slim diet control developed by researchers | जबरदस्त! वजन कमी करण्यासाठी चुंबकाचा खास जुगाड, दोन आठवड्यात ६ किलो वजन होतं कमी

जबरदस्त! वजन कमी करण्यासाठी चुंबकाचा खास जुगाड, दोन आठवड्यात ६ किलो वजन होतं कमी

Next

लंडन - वजन वाढत असलेल्या लोकांसाठी एक चांगली बातमी आहे. वैज्ञानिकांनी वजन कमी करण्यासाठी (Weight Loss) एक असं डिव्हाइस तयार केलंय, ज्याला चुंबक लावलेलं असतं. याला लावल्यावर व्यक्ती आपलं तोंड जास्त उघडू शकत नाही आणि यामुळे तो ठोस पदार्थही खाऊ शकत नाही. एकप्रकारे असं म्हणता येईल की, याने व्यक्तीचं तोंड पूर्णपणे लॉक (Weight loss device) होतं. असं सांगितलं जात आहे की, हे अशाप्रकारचं जगातलं पहिलंच उपकरण आहे.

कसं वापरलं जातं हे डिव्हाइस?

लठ्ठपणाशी लढत असलेल्या जगासाठी न्यूझीलॅंडच्या यूनिव्हर्सिटी ऑफ ओटागो आणि ब्रिटनच्या वैज्ञानिकांच्या ग्रुपने चुंबक आधारित या उपकरणाची निर्मिती केली आहे. याचं नाव डेंटलस्लिम डाएट कंट्रोल डिव्हाइस (Dental slim diet control device) असं आहे. याला एका डेंटीस्टच्या मदतीने दाताच्या वर आणि खालच्या भागात लावलं जातं. हे डिव्हाइस चुंबकाचा वापर करतं, ज्यात खास तयार करण्यात आलेले लॉकिंग बोल्ट लावलेले आहेत.

किती दिवसात किती वजन कमी?

हे डिव्हाइस तोंडात लावल्यानंतर व्यक्ती केवळ २ एमएम इतकंच आपलं तोंड उघडू शकेल. हे डिव्हाइस लावल्यावर तो केवळ द्रव्य पदार्थच सेवन करू शकतो. चुंबकापासून तयार हे  डिव्हाइस लावल्यानंतर व्यक्ती सहजपणे बोलू शकेल आणि श्वासही घेऊ शकेल. ट्रायल दरम्यान, ज्या लोकांना हे डिव्हाइस लावण्यात आलं त्यांचं वजन केवळ दोन आठवड्यात ६.३६ किलोग्रॅम कमी झालं.

चुंबकापासून तयार केलंय हे डिव्हाइस

लोक वजन कमी करण्यास फायदेशीर ठरणाऱ्या या डिव्हाइसमुळे फार आनंदी आहेत आणि ते अजूनही याचा वापर करत आहेत. मुख्य संशोधक प्राध्यापक पॉल ब्रंटन म्हणाले की, 'हे डिव्हाइस फार प्रभावी, सुरक्षित आणि लठ्ठपणाची समस्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आवाक्यात असेल. हे डिव्हाइस एका डेंटीस्टच्या मदतीने लावता येईल आणि काही अडचण असेल तर व्यक्ती सहजपणे याला काढूही शकेल.

६५ कोटी लोक लठ्ठपणाचे शिकार

हे डिव्हाइस अनेकदा लावलं आणि काढलं जाऊ शकतं. ते म्हणाले की, लोक आपल्या खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचा लठ्ठपणा कमी होताना दिसत नाही. चुंबकापासून तयार या डिव्हाइसच्या मदतीने खाण्यावर कंट्रोल ठेवला जाईल. जगभरात साधारण २ अब्ज लोकांचं वजन जास्त आहे. तेच ६५ कोटी लोक लठ्ठपणाचे शिकार आहेत.
 

Web Title: World first weight loss device dental slim diet control developed by researchers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.