बापरे! खराब अन्नामुळे दररोज 340 मुलांचा मृत्यू; जगभरात 16 लाख लोक पडतात आजारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 05:58 PM2023-06-05T17:58:15+5:302023-06-05T18:07:21+5:30

World Food Safety Day 2023: आपल्यापैकी बरेच जण आपल्या घरात, दुकानात, ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये जेवताना विचार करतात की आपण जे खात आहोत त्याचा दर्जा चांगला असेल.

world food safety day 2023 food safety standrads and death due to food poisoning | बापरे! खराब अन्नामुळे दररोज 340 मुलांचा मृत्यू; जगभरात 16 लाख लोक पडतात आजारी

बापरे! खराब अन्नामुळे दररोज 340 मुलांचा मृत्यू; जगभरात 16 लाख लोक पडतात आजारी

googlenewsNext

दरवर्षी जगभरात 7 जून रोजी वर्ल्ड फूड सेफ्टी डे (Food Safety Day ) साजरा केला जातो. लोकांमध्ये खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत जागरुकता यावी हे तो साजरा करण्यामागचं कारण आहे. आपल्यापैकी बरेच जण आपल्या घरात, दुकानात, ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये जेवताना विचार करतात की आपण जे खात आहोत त्याचा दर्जा चांगला असेल. पण अशा अन्नात वापरण्यात येणारे तेल, भाजीपाला, मैदा आणि इतर धान्यांचा दर्जा कोणालाच माहीत नाही. या कारणास्तव अनेक वेळा आपण इतके कुजलेले अन्न खातो की त्यानंतर आजारी पडण्याची शक्यता जास्त असते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, खराब अन्नामुळे एका दिवसात जवळपास 16 लाख लोक आजारी पडतात. निकृष्ट दर्जाच्या अन्नामुळे दररोज पाच वर्षांखालील 340 मुलांना जीव गमवावा लागतो. डब्ल्यूएचओच्या मते, डायरिया आणि कॅन्सरसह 200 आजार आहेत जे लोक असुरक्षित अन्न खाल्ल्याने होतात.

5 गोष्टींकडे प्रत्येकाने दिलं पाहिजे लक्ष 

1. फूड प्रिपरेशन

अन्न तयार करण्यापूर्वी नेहमी साबणाने हात धुवा. स्वच्छ भांडी वापरा. कमी शिजलेले अन्न किंवा कचरा मुख्य अन्नापासून वेगळं ठेवा. अन्न नीट शिजवा.

2. फूड स्टोरेज

फ्रिजमध्ये कोणती वस्तू ठेवावी, कोणती नाही हे अनेकांना माहीत नसतं, कोणत्या गोष्टी झाकून शिजवायच्या आहेत आणि कोणत्या उघड्यावर शिजवायच्या आहेत. अन्न साठवण्याचा उद्देश हा आहे की अन्न टिकून राहावं. 

3. फूड टेम्परेचर

अन्नाचे तापमान त्याच्या गुणवत्तेवर परिणाम करते. म्हणूनच फ्रिजमध्ये कोणते अन्न कच्चे ठेवावे आणि कोणते शिजवल्यानंतर त्याची संपूर्ण माहिती असावी.

4.  फूड हँडलिंग

जेव्हा जेव्हा स्वयंपाकाची तयारी असते तेव्हा काही गोष्टी खराब होऊ लागतात किंवा काही वेळा भाज्या नीट धुतल्या जात नाहीत. अन्न शिजवताना स्वच्छतेची आणि तुम्ही वापरत असलेल्या उत्पादनाची काळजी घ्या.

5. फूड एक्पायरी 

जर तुम्ही पॅकेज केलेले अन्न खरेदी करत असाल तर ते कालबाह्य होऊ नये हे लक्षात ठेवा. 'बेस्ट बाय' म्हणजे खरेदी केल्यानंतर किती दिवसांपर्यंत त्याचा योग्य वापर करायचा आहे, हे वाचा. त्यानुसार ते अन्न वापरा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: world food safety day 2023 food safety standrads and death due to food poisoning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.