दूध, बटाटे-दह्यासोबत हे पदार्थ खाल्ल्याने होतात अनेक आजार, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 04:29 PM2023-06-07T16:29:44+5:302023-06-07T16:30:11+5:30

World food safety day 2023 : आयुर्वेदात काही खाद्य पदार्थ एकत्र खाण्यास मनाई केली आहे. कारण याने पचनशक्ती कमजोर होणे, आम्ल वाढणे, धातुमध्ये गडबड आणि चॅनल बाधित होऊ शकतं.

World food safety day 2023 : Wrong food combination to avoid according to Ayurveda | दूध, बटाटे-दह्यासोबत हे पदार्थ खाल्ल्याने होतात अनेक आजार, वेळीच व्हा सावध!

दूध, बटाटे-दह्यासोबत हे पदार्थ खाल्ल्याने होतात अनेक आजार, वेळीच व्हा सावध!

googlenewsNext

World food safety day 2023 : दरवर्षी 7 जून रोजी वर्ल्ड फूड सेफ्टी डे पाळला जातो. चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे अनेक आजार होऊ शकतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनयजेशननुसार, एका दिवसात 16 लाख लोक असुरक्षित खाण्यामुळे आजारी पडतात. या सवयीमुळे तुम्हाला डायरियापासून ते कॅन्सरपर्यंत 200 आजारी होऊ शकतात. 

आयुर्वेदात काही खाद्य पदार्थ एकत्र खाण्यास मनाई केली आहे. कारण याने पचनशक्ती कमजोर होणे, आम्ल वाढणे, धातुमध्ये गडबड आणि चॅनल बाधित होऊ शकतं. याने तुम्ही आजारी पडू लागता आणि फूड पॉयजनिंग होऊ शकतं.

फूड पॉयजनिंगची माहिती काही लक्षणांवरून मिळते. ज्यात डायरिया, पोटदुखी, मळमळ होणे, उलटी, ताप, थंडी वाजणे, डिहायड्रेशन इत्यादींचा समावेश आहे. अशात खालील पदार्थ एकत्र कधीच खाऊ नये.

दुधासोबत खाऊ नका हे पदार्थ

आयुष मंत्रालयानुसार, दुधासोबत फळं, खरबूज, आंबट फळं, केळी, समोसा, पराठा, खिचडी इत्यादींचं सेवन करू नये. तुम्ही दूध चहासोबत उकडूही नये. ज्यामुळे अनेक आजार होऊ शकतात.

गहू, ज्वारीसोबत खाऊ नका हे पदार्थ

धान्याचं सेवन आपण रोज करतो आणि त्यांच्यासोबत अनेक फळंही खातो. पण अनेकांना हे माहीत नसतं की, हीच किती मोठी चूक आहे. आयुर्वेदात धान्याला फळांसोबत आणि साबुदान्यासोबत खाणं घातक मानलं आहे.

प्रोटीनसोबत काय खाऊ नये

जर तुम्ही प्रोटीन असलेल्या पदार्थांचं सेवन करत असाल तर त्यासोबत काही पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे की, प्रोटीन, फॅट आणि स्टार्चला पचनासाठी जास्त वेळ लागतो. त्यामुळे प्रोटीनसोबत फॅट असलेले आणि स्टार्च असलेले पदार्थ खाऊ नये.

दह्यासोबत काय खाऊ नये

उन्हाळ्यात दह्याचं सेवन करणं फायदेशीर असतं. याने पचन सुधारतं. पण यासोबत काही चुकीच्या गोष्टी खाल्ल्या तर पोट बिघडू शकतं. तुम्ही दह्यासोबत बीन्स, चीज़, हॉट ड्रिंक्स, आंबट फळं, आंबा, अंडी आणि मासे खाऊ नयेत.

बटाट्यासोबत काय खाऊ नये

बटाटे, टोमॅटो, वांगी, शिमला मिरची इत्यादी नाइटशेड फॅमिलीतील आहेत. अशात यांच्यासोबत काकडी, खरबूज, दूध-पनीर इत्यादी खाऊ नये. याने समस्या होतात.

Web Title: World food safety day 2023 : Wrong food combination to avoid according to Ayurveda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.