World Handwash Day : अनेक गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठी 'या' सोप्या पद्धतीने धुवा हात!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 10:38 AM2018-10-15T10:38:38+5:302018-10-15T10:39:56+5:30
आजारांचं मुख्य कारण म्हणजे अस्वच्छता. आपल्या अस्वच्छ हातांमार्फत अनेक बॅक्टेरिया आपल्या तोंडामार्फत पोटात जाऊन अनेक आजारांना आमंत्रण देतात.
आजारांचं मुख्य कारण म्हणजे अस्वच्छता. आपल्या अस्वच्छ हातांमार्फत अनेक बॅक्टेरिया आपल्या तोंडामार्फत पोटात जाऊन अनेक आजारांना आमंत्रण देतात. हातांच्या स्वच्छतेचे महत्त्व समजावण्यासाठी दरवर्षी 15 ऑक्टोबरला संपूर्ण जगभरात वर्ल्ड हॅन्डवॉश डे साजरा करण्यात येतो. या दिवशी आपले हात स्वच्छ ठेवण्याचं महत्त्व समजावून सांगण्यात येतं. त्याचबरोबर हात धुण्याची योग्य पद्धतही सांगण्यात येते.
वॉशरूममधून आल्यानंतर हात धुणं आवश्यक
सेंटर ऑफ इन्फेक्शन डिजीज रिसर्च आणि पॉलिसीच्या डायरेक्टर यांनी न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, अनेकदा जी लोकं वॉशरूमला जातात. ती लोकं हात धुण्याला जास्त महत्त्व देत नाहीत. परंतु असं करणं फार घातक ठरतं कारण यामुळे सर्वात जास्त बॅक्टेरिया पसरण्याची शक्यता असते. त्यांनी सांगितलं की, वॉशरूमच्या दरवाजाला लावण्यात आलेल्या हॅन्डलमुळे अनेक बॅक्टेरिया शरीरामध्ये प्रवेश करतात. त्यामुळे वॉशरूमवरून आल्यानंतर आपले हात अवश्य धुतले पाहिजेत.
कोणते आजार पसरू शकतात
आपण बराचवेळ घराबाहेर घालवतो. त्यामुळे आपल्या नकळत आपण अनेक ठिकाणी हातांनी स्पर्श करतो आणि त्याठिकाणचे बॅक्टेरिया आपल्या हातांना येतात. या बॅक्टेरियामुळे ताप, सर्दी-खोकला, उलट्या त्याचसोबत पोटाच्या वेगवेगळ्या समस्या होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे हात स्वच्छ ठेवणं गरजेचं असतं.
तीन पद्धतींनी हात स्वच्छ करा
पहिली स्टेप - पाण्याच्या टेम्प्रेचरची चिंता करू नका
अनेकदा लोकं थंडीमध्ये थंड पाण्यामुळे आणि उन्हाळ्यामध्ये गरम पाण्यामुळे हात धुणं टाळतात. पण असं करणं शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे पाणी थंड असो किंवा गरम हात धुणं गरजेचं असतं.
दुसरी स्टेप - हातांना व्यवस्थित साबण लावा
लोक हात धुताना साबण व्यवस्थित न लावता घाई गडबडीमध्ये हात धुतात. असं न करता आपल्या हातांना व्यवस्थित साबण लावा. आपल्या हाताचा तळवा, बोटांच्या मधील जागा, नखांच्या जवळ व्यवस्थित साबण लावा. त्यानंत हात पाण्याने स्वच्छ धुवा.
तिसरी स्टेप - बाहेर जाण्याआधी हात कोरडे करा
कोरड्या हातांपेक्षा ओल्या हातांवर जास्त बॅक्टेरिया पसरतात. त्यामुळे वॉशरूममधून बाहेर पडताना टॉवेल किंवा पेपर टॉवेलने हात कोरडे करा.
अशावेळी अवश्य हात धुवा
- जेवण्याआधी आणि जेवल्यानंतर अवश्य हात धुवा.
- वॉशरूममधून आल्यावर
- घराची साफसफाई करताना
- ऑफिसवरून घरी आल्यानंतर
- एखाद्या पाळीव प्राण्याला हात लावल्यानंतर
- आजारी माणसाला भेटल्यानंतर
- शिंका किंवा खोकला आल्यावर
- खेळून आल्यानंतर