आवाजात जडपणा-गिळण्यास त्रास, मान व डोक्याच्या कॅन्सरच्या या 6 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 04:24 PM2022-07-27T16:24:30+5:302022-07-27T16:24:48+5:30

World head neck cancer day : दिल्लीतील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये सर्जिकल ऑन्कोलॉजीचे निर्देशक आणि यूनिट हेट डॉ. प्रतिक वार्ष्णेय यांच्यानुसार, या कॅन्सरचं मुख्य कारण तंबाखूचं सेवन, धुम्रपान, मद्यसेवन आणि ह्यूमन पॅपिलोमा व्हायरल म्हणजे एचपीवी संक्रमण आहे.

World head neck cancer day : Doctor explain 6 sign and symptoms | आवाजात जडपणा-गिळण्यास त्रास, मान व डोक्याच्या कॅन्सरच्या या 6 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

आवाजात जडपणा-गिळण्यास त्रास, मान व डोक्याच्या कॅन्सरच्या या 6 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

googlenewsNext

दरवर्षी  27 जुलैला वर्ल्ड हेड अॅन्ड नेक कॅन्सर डे (World Head and Neck Cancer Day) पाळला जातो. डोकं किंवा मानेचा कॅन्सर एक समूह आहे ज्यात तोंड, जीभ, गाल, थायरॉइड, पॅरोटिड, टॉन्सिल, लॅरिक्सला प्रभावित करणाऱ्या कॅन्सरचा समावेश आहे. हा भारतात आढळणारा कॅन्सरचा सर्वात कॉमन प्रकार आहे. 

दिल्लीतील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये सर्जिकल ऑन्कोलॉजीचे निर्देशक आणि यूनिट हेट डॉ. प्रतिक वार्ष्णेय यांच्यानुसार, या कॅन्सरचं मुख्य कारण तंबाखूचं सेवन, धुम्रपान, मद्यसेवन आणि ह्यूमन पॅपिलोमा व्हायरल म्हणजे एचपीवी संक्रमण आहे. ही सगळी कारण टाळली जाऊ शकतात, त्यामुळे या कॅन्सरपासून बचाव शक्य आहे.

कॅन्सरची कारणं

जीवनशैलीमध्ये सुधारणा आणि अशाप्रकारच्या नशेपासून दूर राहिल्यास हा कॅन्सरपासून बचाव होऊ शकतो. तरूणांना तंबाखूचं सेवन, धुम्रपान आणि मद्यसेवनाच्या दुष्परिणामांबाबत जागरूक करणं फार गरजेचं आहे.

कॅन्सरची लक्षणं

स्क्रीनिंगच्या सुरूवातीला असा कॅन्सर समजून येऊ शकतो. तोंडात अशी जखम किंवा फोड जो भरत नाहीये, आवाजात जडपणा, गिळण्यास समस्या, चेहरा किंवा मानेवर गाठ किंवा सूज कोणत्याही प्रकारच्या मॅलिग्नेंसचं लक्षण असू शकतो. याची लगेच टेस्ट केली पाहिजे. कॅन्सरचं निदान करण्यासाठी अल्सर किंवा सूज असलेल्या भागावर बायस्पी केली जाते. 

कॅन्सरपासून वाचण्याचे उपाय

तंबाखूचं कोणत्याही स्वरूपात सेवन बंद करावं. तरूणांना तंबाखूपासून दूर राहण्यासाठी जागरूक केलं पाहिजे. जर सुरूवातीलाच कॅन्सरचं निदान झालं तर वेळीच उपचार करून कॅन्सर दूर करता येऊ शकतो.

Web Title: World head neck cancer day : Doctor explain 6 sign and symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.