चिंताजनक! आता कोरोना विषाणू दीर्घकाळ पाठ सोडणार नाही; WHO ची धोक्याची सुचना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 02:00 PM2020-08-02T14:00:06+5:302020-08-02T14:12:10+5:30

CoronaVirus News & Latest Updates : जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना विषाणू हा दीर्घकाळसोबत राहू शकतो.

world health organisation warned that they are expecting lengthy corona virus pandemic | चिंताजनक! आता कोरोना विषाणू दीर्घकाळ पाठ सोडणार नाही; WHO ची धोक्याची सुचना

चिंताजनक! आता कोरोना विषाणू दीर्घकाळ पाठ सोडणार नाही; WHO ची धोक्याची सुचना

Next

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या माहामारीबाबत धोक्याची सुचना दिली आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कोरोना विषाणूने भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये थैमान घातलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना विषाणू हा दीर्घकाळसोबत राहू शकतो. 6 महिन्यांच्या मुल्यांकनावर आधारित झालेल्या आपातकालीन बैठकीत तज्ज्ञांनी ही माहिती दिली आहे.

 कोरोना व्हायरसचा प्रसार सुरु होऊन आता 7 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. आपातकालीन बैठकीत कोरोनाच्या वाढत्या प्रसाराबाबत माहिती देण्यात आली. या बैठकीनंतर तज्ज्ञांनी कोरोनाच्या माहामारीचा धोका दीर्घकाळसोबत राहणार असल्याचे सांगितले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे जवळपास 6,80,000 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 1 कोटी 80 लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.  

जागतिक आरोग्य संघटनेतील 17 सदस्य आणि 12 सल्लागार यांनी दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय पातळीवर सार्वजनिक आरोग्यविषयक आणीबाणीत या माहामारीचा समावेश झाला आहे. अनेक देशांनी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन केलं होतं. सगळेच क्षेत्र बंद असल्यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर तणाव पडला आहे.

या समीतीने जागतिक आरोग्य संघटनेला लस तयार करण्यासाठी इतर देशांची मदत करण्याचे आवाहन केलं आहे. व्हायरसच्या प्रसाराच्या इतर माध्यमांवर लक्ष देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय संक्रमणाचं माध्यम, व्हायरसचं मुळ, म्युटेशन, संक्रमणापासून बचाव, रोगप्रतिकारकशक्ती यांवर अधिक जोर देण्याची मागणी या बैठकित करण्यात आली.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी सांगितले की, ही माहामारी दीर्घकाळ सोबत राहणार आहे. अशी माहामारी 100 वर्षातून एकदा येते. पण अनेक दशकांवर या माहामारीचा प्रभाव पडतो. त्यासाठी वातावरणातील बदलांमुळे उद्भवत असलेल्या इंफ्युएंजा आणि इतर व्हायरसशी सामना करण्यासाठी प्रत्येक देशातील आरोग्य व्यवस्थेनं तयार राहायला हवं. 

दरम्यान गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 54,735 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 853 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 17 लाखांवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात आतापर्यंत 37,364 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

Coronavirus vaccine : सर्वातआधी कुणाला दिला जाईल कोरोना व्हायरस वॅक्सीनचा डोस?

रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी  FSSI दिल्या 'या' टिप्स; कोरोनाशी लढण्यासाठी ठरतील प्रभावी

Web Title: world health organisation warned that they are expecting lengthy corona virus pandemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.