जागतिक आरोग्य संघटना म्हणते की जेट लॅगमुळे होतो आरोग्यावर दुष्परिणाम. जेट लॅग टाळायचा असेल तर हे 6 उपाय कराच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2017 06:13 PM2017-06-06T18:13:29+5:302017-06-06T18:13:29+5:30

जेट लॅग टाळून जर प्रवासातील ऊर्जा वाचवायची असेल आणि आरोग्यही सांभाळायचं असेल तर काही खबरदारीचे उपाय नक्की घ्यायला हवेत

World Health Organization says that jet lag leads to health-related consequences. If you want to avoid jet lag this 6 measures! | जागतिक आरोग्य संघटना म्हणते की जेट लॅगमुळे होतो आरोग्यावर दुष्परिणाम. जेट लॅग टाळायचा असेल तर हे 6 उपाय कराच!

जागतिक आरोग्य संघटना म्हणते की जेट लॅगमुळे होतो आरोग्यावर दुष्परिणाम. जेट लॅग टाळायचा असेल तर हे 6 उपाय कराच!

Next

 

- अमृता कदम

कमीत कमी वेळेत आरामदायी प्रवासाचा सर्वांत उत्तम पर्याय म्हणजे विमान प्रवास. त्यामुळेच अनेक जण बाय रोड किंवा ट्रेननं प्रवास करण्याऐवजी हवाई सफरीला प्राधान्य देतात. परदेशी प्रवासासाठी तर विमानप्रवासाला पर्यायच नाही! पण वारंवार केलेला विमान प्रवास किंवा जास्त अंतराचा वेळखाऊ विमान प्रवास केल्यानंतर जेट लॅगही सहन करावा लागतो. थकवा आणि चक्कर येणं, अनिवार झोप यांमुळे प्रवासाच्या आनंदावर विरजण पडतं. जेट लॅगचा आरोग्यावरही विपरित परिणाम होताना दिसतो. जागतिक आरोग्य संघटनेनं अनेकांना जेट लॅगमुळे अपचन, ब्लड प्रेशरमध्ये अचानक होणारे चढ-उतार यासारख्या समस्यांना सामोरे जावं लागत असल्याचं म्हटलं आहे. जेट लॅग टाळून जर प्रवासातील ऊर्जा वाचवायची असेल आणि आरोग्यही सांभाळायचं असेल तर काही खबरदारीचे उपाय नक्की घ्यायला हवेत. पुढच्यावेळेस जेव्हा लांबचा विमान प्रवास कराल, तेव्हा या काही टीप्स आवर्जून लक्षात ठेवा. तुमचा प्रवासाचा कंटाळा दूर व्हायला याची नक्की मदत होईल.

 

       

4. पोहचल्यावर हॉटेलमध्ये जाऊन मस्तपैकी ताणून द्यायची हा विचार मनातून आधी काढून टाका. हा उपाय थोडासा अव्यवहार्य वाटेल. पण तुमचा जेट लॅगचा त्रास कमी व्हायला त्याची नक्की मदत होईल. पोहचल्यावर हॉटेलच्या आवारातच फेरफटका मारा. आणि हो विमानातही जर झोप घेणं टाळता आलं, तर अधिक उत्तम!

5. जेव्हा तुम्ही तुमच्या हॉटेलमध्ये पोहचाल, तेव्हा चादरीमध्ये गुरफटून जाण्याऐवजी खोलीच्या खिडक्या मस्तपैकी उघडा आणि प्रकाश-मोकळी हवा आत येऊ द्या. तुम्हाला ताजंतवानं वाटेल.

6. सगळ्यांत महत्त्वाचं तुमचं व्यायामाचं रूटिन चुकवू नका. कारण व्यायामामुळे शरीराची परिस्थितीशी जुळवून घेण्याची लवचिकता वाढते. त्यामुळे प्रवासात आणि एरवीही व्यायाम न चुकवणं तुमच्यासाठी नेहमीच फायदेशीर ठरेल. पुढच्यावेळेस जेव्हा लांबचा विमान प्रवास कराल, तेव्हा या काही टीप्स आवर्जून लक्षात ठेवा. तुमचा प्रवासाचा कंटाळा दूर व्हायला नक्की मदत होईल.

Web Title: World Health Organization says that jet lag leads to health-related consequences. If you want to avoid jet lag this 6 measures!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.