World Heart Day 2018 : हार्ट स्ट्रोकची 'ही' लक्षणं तुम्हाला माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 04:29 PM2018-09-29T16:29:42+5:302018-09-29T16:30:08+5:30

अनियमित जीवनशैली, तणाव आणि चिंता यांसारख्या कारणांमुळे जगभरात हार्ट स्ट्रोकच्या रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

World Heart Day 2018 : You know the symptoms of heart stroke | World Heart Day 2018 : हार्ट स्ट्रोकची 'ही' लक्षणं तुम्हाला माहीत आहेत का?

World Heart Day 2018 : हार्ट स्ट्रोकची 'ही' लक्षणं तुम्हाला माहीत आहेत का?

Next

अनियमित जीवनशैली, तणाव आणि चिंता यांसारख्या कारणांमुळे जगभरात हार्ट स्ट्रोकच्या रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. हार्ट स्ट्रोकसंदर्भातील सर्वात मोठी समस्या म्हणजे, अनेकदा रूग्णाला त्याच्या शरीरात होणारे बदल म्हणजे हार्ट स्ट्रोकची लक्षणं आहेत हेच समजत नाही. हार्ट स्ट्रोकमुळे शरीरामध्ये अनेक बदल दिसून येतात. हे बदल लक्षात घेऊन त्यावर योग्य ते उपचार घेणं गरजेचं असतं. नाहीतर अनेक गंभीर परिणामांना सामोरं जावं लागतं. 

शरीर सुन्न पडणे

तुम्हाला कधी कधी तुमचं शरीर सुन्न झाल्यासरखं जाणवतं का? किंवा मग अचानक शरीरात ताकदच नाही असं कधी होतं का? असं होत असेल तर लगेचच डॉक्टरकेड जा. कारण असं होणं हे हार्ट स्ट्रोकचं लक्षण असू शकतं. अशा परिस्थितीत शरीराचा एखादा भाग सुन्न होतो. 

चेह-यावरचा एक भाग निकामी होणे

जेव्हा मेंदूचा एखाद्या भाग प्रभावित होतो त्यावेळी त्याचा परिणाम चेहऱ्यावर दिसू लागतो. त्यामुळे चेहऱ्याची एक बाजू निकामी होते. तसेच त्यामुळे चेहऱ्यावरील हावभावांवरही परिणाम दिसून येतो. स्ट्रोकमुळे तोंड आणि डोळे प्रभावित होतात. 

छातीत दुखणे 

छातीत दुखणं हे स्ट्रोक असण्याचं सामान्य लक्षण आहे. बऱ्याचदा गॅस किंवा साधारणं दुखणं समजून या लक्षणाकडे दुर्लक्ष करण्यात येतं. त्यामुळे त्वरित डॉक्टरांकडे जाऊन यावर तोडगा काढणं गरजेचं असतं. 

जिभेचं व्यंग 

अनेकदा हार्ट स्ट्रोकचा परिणाम जिभेवरही दिसून येतो. कारण जिभेचं नियंत्रण मेंदूवर अवलंबून असतं. त्यामुळे अनेकदा स्ट्रोकचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना बोलताना त्रास होतो. स्ट्रोक दरम्यान स्पीच मसल्स पॅरलाइझ होतात. त्यामुळे व्यक्तीने अनेक प्रयत्न केल्यानंतरही त्या बोलू शकत नाहीत. 

धुरकट दिसणे

आपल्या शरीराचे सर्व अवयव मेंदूमार्फत नियंत्रित करण्यात येतात. जर मेंदू ठिक काम करत नसेल तर त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. स्ट्रोक दरम्यान डोळ्यांची दृष्टी कमकुवत होते. 

Web Title: World Heart Day 2018 : You know the symptoms of heart stroke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.