हृदय निरोगी ठेवण्यासाठी काय करावे - काय करू नये? होणार नाही हार्ट अटॅकचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 10:04 AM2023-09-29T10:04:50+5:302023-09-29T10:05:47+5:30

World Heart Day : आजच्या धावपळीच्या जीवनात हृदय निरोगी ठेवायचं असेल तर काही गोष्टींची काळजी घ्यावीच लागेल नाही तर तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. 

World Heart Day : How to keep heart healthy and fit know the tips | हृदय निरोगी ठेवण्यासाठी काय करावे - काय करू नये? होणार नाही हार्ट अटॅकचा धोका

हृदय निरोगी ठेवण्यासाठी काय करावे - काय करू नये? होणार नाही हार्ट अटॅकचा धोका

googlenewsNext

World Heart Day : जगभरात दिवसेंदिवस हृदयरोगांच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. इतकंच नाही तर जगात सगळ्यात जास्त मृत्यू हृदरोगांमुळे होतात. बदलती लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी याला कारणीभूत असतात. कमी वयातच लोकांना हृदयासंबंधी आजारांचा सामना करावा लागतोय. अशात आजच्या धावपळीच्या जीवनात हृदय निरोगी ठेवायचं असेल तर काही गोष्टींची काळजी घ्यावीच लागेल नाही तर तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. 

हृदय निरोगी ठेवणं फार गरजेचं झालं आहे. पण अनेकांना हे माहीत नसतं की, हृदय निरोगी ठेवण्यासाठी नेमकं काय करावं. आज आम्ही तुम्हाला याच्याच काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. जेणेकरून तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

आहाराची निवड

हृदय आणि आरोग्य निरोगी ठेवण्यात सगळ्यात महत्वाची भूमिका असते की, हिरव्या पालेभाज्या आणि फळांची. तसेच बदाम, अक्रोड, पिस्ता, शेंगदाणे, कलिंगडा बियाही फायदेशीर असतात. बाहेरचं खाणं फार कमी केलं पाहिजे. 

त्यासोबतच दूध, दही, ताक यानेही आरोग्य चांगलं राहतं. ग्रीन, ब्लॅक टी चं सेवन करूनही शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करू शकता. म्हणजेच याने हृदय निरोगी राहतं. शरीरात रक्तप्रवाह सुरळीत राहतो.

काय खाणं टाळावं?

अनेकांना जेवणात वरून मीठ घेण्याची सवय असते. ही सवय त्यांच्यासाठी फार जास्त घातक आहे. तसेच वेगवेगळ्या फास्ट फूडमध्येही मिठाचं प्रमाण अधिक असतं. जास्त मिठामुळे हृदयाचं नुकसान होतं. त्यामुळे मीठ आणि साखरेचं सेवन कमीत कमी करा.

तसेच जास्त कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ कमी खावीत. फास्ट फूड आणि जंक फूड फार कमी खावेत. कारण मार्केटमधील हे पदार्थ फारच स्वस्त आणि खराब क्वालिटीच्या तेलात बनवलेले असतात. याचा थेट प्रभाव हृदयावर पडतो. एकदा वापरलेलं तेल पुन्हा पुन्हा वापरलं जातं.

पाकिटातील पदार्थ टाळा

प्रोसेस्ड आणि प्रिजर्व्ड म्हणजे डब्यात बंद असलेले पदार्थ खाल्ल्याने आरोग्य खासकरून हृदयाला जास्त नुकसान होतं. 'रेडी टू इट' म्हणजे सेमी कुक्ड पदार्थ जसे की, भाज्या, बिर्याणी, पराठे, मिठाई इत्यादी तसेच पॅकेटमधील ज्यूस, सॉफ्ट ड्रिंक्स सुद्धा हृदयासाठी नुकसानकारक ठरतं.

एक्सरसाइज गरजेची

कितीही कंटाळा आला तरी रोज कमीत कमी अर्धा तास तुम्ही कोणतीही एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. पायी चालावं किंवा रनिंग करावी यानेही बराच फायदा मिळतो. एक्सरसाइजने शरीरातील नसा मोकळ्या होतात, फॅट बर्न होतं, रक्तप्रवाह सुरळीत होतो. ज्यामुळे हृदय निरोगी राहतं.

Web Title: World Heart Day : How to keep heart healthy and fit know the tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.