World Heart Day: डायबिटीस रुग्णांना असते हृदयविकाराची धास्ती; धोका टाळण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 11:02 AM2019-09-29T11:02:41+5:302019-09-29T11:04:39+5:30
धकाधकीची जीवनशैली आणि बदलणाऱ्या लाइफ स्टाइलमुळे अनेक लोकांना हृदयाशी निगडीत समस्यांचा सामना करावा लागतो. दरवर्षी 29 सप्टेंबरला 'वर्ल्ड हार्ट डे' साजरा करण्यात येतो.
(Image Credit : healthindustryhub.com.au)
धकाधकीची जीवनशैली आणि बदलणाऱ्या लाइफ स्टाइलमुळे अनेक लोकांना हृदयाशी निगडीत समस्यांचा सामना करावा लागतो. दरवर्षी 29 सप्टेंबरला 'वर्ल्ड हार्ट डे' साजरा करण्यात येतो. जाणून घेऊया आपलं हृदय आणि त्यांच्या आरोग्याशी निगडीत काही अशा गोष्टी ज्या हृदयाचे आरोग्य चांगलं राखण्यासाठी आवश्यक असतात.
डायबिटीस रूग्णांना हृदय रोगाचा धोका जास्त असतो. हेल्दी हार्ट आणि उत्तम कार्डियोवॅस्क्युलर हेल्थसाठी ब्लड शुगर लेवल कंट्रोल करणं अत्यंत आवश्यक असतं. डायबिटीसच्या रूग्णांमधील 65 टक्क्यांपेक्षा जास्तीत जास्त लोक हृदयाशी संबंधित आजारांनी त्रस्त आहेत. त्यांच्यामध्ये हार्ट अटॅकचा धोका हळूहळू वाढतो. तसेच काही लोकांमध्ये ही लक्षणं वेगाने वाढतात.
डायबिटीस असलेल्या रूग्णांनी हार्ट अटॅकपासून बचाव करण्यासाठी काळजी घेणं आवश्यक ठरतं. आज आम्ही काही उपाय सांगणार आहोत. जे डायबिटीस असणाऱ्या रूग्णांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतील.
ब्लड शुगर ठेवा कंट्रोलमध्ये...
डायबिटीस असणाऱ्या रूग्णांनी आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवणं आवश्यक असतं. काही संशोधनांमधून सिद्ध झाल्यानुसार, जर डायबिटीस झाल्यापासून सुरुवातीच्या 10 वर्षांमध्ये जर डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवलं तर हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते.
वजन नियंत्रणात असणं आवश्यक...
लठ्ठपणाने त्रस्त असणाऱ्या लोकांनी आपलं वजन नियंत्रणात ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. त्याचबरोबर हेल्दी लाइफस्टाइल आणि बॅलेंस्ड डाएट घेतल्याने वजन कमी करणं सहज शक्य होईल. त्याचबरोबर कार्डियोवॅस्क्युलर हेल्थ उत्तम राखण्यास मदत होईल.
धुम्रपान करणं सोडा...
धुम्रपान करणं आरोग्यासाठी घातक असल्याचे आपण अनेकदा ऐकतो. त्यामुळे धुम्रपान आणि तंबाखूपासून शक्य तेवढे लांब राहा. जर तुम्हाला या दोन पदार्थांपासून दूर राहणं शक्य नसले तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हार्ट चेकअप करा
रूटिन चेक-अप करून घेणं अत्यंत आवश्यक असतं. अशातच रूटिन चेकअपमध्ये हार्ट चेक-अप करायला अजिबात विसरू नका. हृदयाच्या आजारांची लक्षणं योग्य वेळी ओळखण्यासाठी डायबिटीस रूग्णांनी वेळोवेळी हार्ट चेकअप करणं आवश्यक असतं.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत फायदेशीर ठरतं.)