World Hypertension day: या पाच गोष्टी खा;ब्लडप्रेशरचं टेन्शन होईल गुल्ल...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 05:28 PM2021-05-17T17:28:46+5:302021-05-17T17:39:14+5:30
तुम्ही रोज खाल्ल्या जाणाऱ्या अन्नातूनच ब्लडप्रेशरचा सामना करू शकता.
सध्याच्या ब्लडप्रेशरच्या समस्या बघुनच कोणाचंही ब्लड प्रेशर वाढेल. सततच टेन्शन, अवेळी खाणे, बदलेली लाईफस्टाईल याचा एकुणच परिणाम म्हणजे ब्लडप्रेशर. आता तर कमी वयातही ब्लडप्रेशर त्यातून निर्माण होणाऱ्या हायपरटेन्शनसारख्या परिणामांना सामोरे जावे लागते. यावर अॅलोपेथिक डॉक्टर विविध औषध आणि गोळ्या देतात. आयुर्वेदातही यावर काही उपचार आहेत. तुम्ही रोज खाल्ल्या जाणाऱ्या अन्नातूनच ब्लडप्रेशरचा सामना करू शकता.
हिरव्या भाज्या
हिरव्या भाज्यांमध्ये फायबर, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, सी असे अनेक गुणधर्म असतात जे शरीरासाठी फायदेशीर आहेत. या गुणधर्मांमुळे ब्लडप्रेशर कमालीचे नियंत्रणात राहते. त्यामुळे शरीरात भरपूरप्रमाणात उर्जा राहते तसेच हृदयाशी संबधित आजारही दूर राहतात.
आंबट फळे
लिंबू, संत्र, द्राक्ष या फळांमध्ये ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक गुणधर्म असतात. तसेच यामुळे हृदयाच्या आजारांवरही नियंत्रण मिळवता येते. तसेच या फळांचा ज्यूस प्यायल्याचे ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्यासोबतच भरपूर फायदे आहेत.
भोपळ्याच्या बिया
भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि अमिनो अॅसिड असते. हे ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते. भोपळ्याच्या बियांपासून बनवलेले तेल हे ब्लडप्रेशरवर रामबाण उपाय मानले जाते.
कॉलीफ्लॉवर
या भाजीमध्ये सल्फोराफेन असते. हे हृदयाशी संबधित सर्व आजारांना दूर ठेवण्याचे महत्त्वाचे काम करते. तसेच यामुळे ब्लडप्रेशरही नियंत्रणात राहते. धमन्यांचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठीही हे फार फायद्याचे ठरते.
केळं
केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम असतं. त्यामुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच केळं सहज उपलब्ध असल्याने तुम्ही केळं कुठेही खाऊ शकता.