World Kidney Day 2022: या ५ सवयी आजच सोडा, नाही तर किडनीचं होईल मोठं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 12:21 PM2022-03-10T12:21:30+5:302022-03-10T12:22:04+5:30
World Kidney Day : किडनी निरोगी ठेवणं आणि निरोगी ठेवण्यासाठी काही चुकीच्या सवयी बदलणं फार गरजेचं असतं. अशाच काही सवयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
World Kidney Day : १० मार्चला वर्ल्ड किडनी डे (World Kidney Day) असतो. या दिवशी लोकांमध्ये किडनीसंबंधी आजारांबाबत जागरूक केलं जातं. किडनी आपल्या शरीरातील सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक अवयव आहे. ज्याद्वारे शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढले जातात. अशात किडनी निरोगी ठेवणं आणि निरोगी ठेवण्यासाठी काही चुकीच्या सवयी बदलणं फार गरजेचं असतं. अशाच काही सवयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
१) जास्त गोड खाणं सोडा
जर तुम्हाला जास्त गोड पदार्थ खाण्याची सवय असेल तर याने लठ्ठपणा, हाय ब्लड प्रेशर आणि डायबिटीससारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. आणि पुढे जाऊन या समस्यांचा किडनीवरही प्रभाव पडतो. त्यामुळे वेळीच सावध होऊन गोड पदार्थ कमी खाल्ले तर पुढे होणारा धोका कमी केला जाऊ शकतो.
२) स्मोकिंग
स्मोकिंग (Smoking) अनेक आजारांचं मूळ मानलं जातं. प्रत्येकांनाच माहीत आहे की, स्मोकिंग केल्याने कॅन्सर होतो. पण फार कमी लोकांना माहीत असेल की, धुम्रपान केल्याने लघवीतील प्रोटीनचं प्रमाण वाढतं ज्याने किडनीला नुकसान पोहोचतं.
३) पुरेशी झोप न घेणे
शरीराचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी चांगली आणि पुरेशी झोप घेणं फायदेशीर ठरतं. किडनीच्या आरोग्यासाठीही पुरेशी झोप घेणं फायदेशीर आहे. कारण स्लीपिंग सायकलचं किडनीच्या कार्याशी सरळ संबंध असतो. त्यामुळे पुरेशी झोप घ्या आणि किडनी निरोगी ठेवा.
४) मद्यसेवन
जे लोक नियमित जास्त प्रमाणात मद्येवन करतात त्यांना क्रोनिक किडनी डिजीज होण्याच्या धोका जास्त असतो. दारूने केवळ किडनीच नाही तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होता. कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर, लठ्ठपणा याही समस्या होतात. त्यामुळे मद्यसेवन बंद करा.
५) जास्त मीठ खाणं
जास्त मीठ म्हणजे सोडियमयुक्त जेवण केल्यान ब्लड प्रेशर खूप वाढतं. याने किनडीसंबंधी वेगवेगळ्या समस्या होण्याचा धोका असतो. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मिठाचं सेवन कमी करा.