किडनी साफ ठेवण्यासाठी आणि स्टोन बाहेर काढण्यासाठी लगेच करा 'हे' सोपे उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 10:10 AM2024-03-14T10:10:01+5:302024-03-14T10:10:26+5:30
World Kidney Day: नियमितपणे किडनींची स्वच्छता तुम्ही घरीच करू शकतात आणि अनेक गंभीर आजारांचा धोका आधीच टाळू शकता.
World Kidney Day: शरीरातील विषारी पदार्थ वाहेर काढण्याचं काम किडनी करतात. किडनी खराब झाल्या तर अनेक गंभीर आजार होऊ शकतात. अशात नियमितपणे किडनींची स्वच्छता तुम्ही घरीच करू शकतात आणि अनेक गंभीर आजारांचा धोका आधीच टाळू शकता. तेच उपाय आज आम्ही तुम्हाला World Kidney Day निमित्ताने सांगणार आहोत.
किडनी साफ करण्याचे सोपे उपाय
दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरूवारी वर्ल्ड किडनी डे (World Kidney Day) पाळला जातो. किडनी मानवी शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. जे शरीरातील रक्त साफ करण्याचं आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचं काम करतात. अशात त्यात बरेच विषारी पदार्थ जमा होण्याचा धोका असतो. अशात त्यांची स्वच्छता करावी लागते.
लिंबाचा रस
लिंबाचा रस नैसर्गिकपणे आम्लीय असतो आणि लघवीमध्ये सिट्रेटची लेव्हल वाढवतं. ज्यामुळे किडनी स्टोन होण्याचा धोका कमी होतो. लिंबाचा रस रक्त साफ करतो आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतो.
अॅपल व्हिनेगर
अॅपल व्हिनेगर किडन्यांना निरोगी ठेवण्यास मदत करतं. यात सिट्रिक अॅसिड असतं जे किडनी स्टोन तोडण्याचं काम करतं. अॅपल व्हिनेगरचं नियमितपणे सेवन केलं तर किडनीतून विषारी पदार्थ बाहेर निघून जातात.
कलिंगडाचा रस
कलिंगडात पाणी भरपूर असतं. याने किडनी हायड्रेट आणि साफ राहते. कलिंगडामध्ये लायकोपीन भरपूर प्रमाणात असतं, जे किडन्यांना योग्यपणे काम करण्यास मदत करतं. तसेच या पोटॅशिअमही भरपूर असतं जे किडनी स्टोन होण्यापासून रोखतं.
डाळिंबाचा रस
डाळिंबाचा रस आणि दाणे दोन्हींमध्ये पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे हा किडनी स्टोन बाहेर काढण्यासही मदत करतो. पोटॅशिअम लघवीतील आम्लता कमी करतो, याने किडनी स्टोन होत नाही. तसेच किडनीतील विषारी पदार्थही बाहेर काढतो.
तुळशीचं पाणी
तुळशीचं पाणीही फार फायदेशीर असतं. याने किडनी स्टोन निघतो आणि किडनीचं काम चांगलं होतं. तुलशीतील तत्व जसे की, एसेंशिअम ऑइल आणि अॅसिडिक अॅसिड किडनी स्टोनला तोडतात आणि ते सहजपणे बाहेर काढतात.
सगळ्यात बेस्ट उपाय
किडनी निरोगी आणि साफ ठेवण्यासाठी एक्सपर्ट नियमितपणे भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. कारण याने किडनी सतत साफ होत राहते. त्यामुळे कधीही पाणी कमी पिण्याची चूक करू नका.