World Kidney Day : क्रोनिक किडनी डिजीजमध्ये आहार ठरतो महत्त्वाचा, ही डाएट करू शकता फॉलो!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 11:31 AM2019-03-14T11:31:04+5:302019-03-14T11:31:26+5:30

किडनी ही आपल्या शरीरातील महत्त्वपूर्ण अंग आहे. खराब लाइफस्टाइल आणि एखाद्या औषधाच्या दुष्परिणामामुळे अनेकदा किडनीमध्ये समस्या होऊ शकते.

World Kidney Day: Very important in chronic kidney disease taking care of the food these diets can follow | World Kidney Day : क्रोनिक किडनी डिजीजमध्ये आहार ठरतो महत्त्वाचा, ही डाएट करू शकता फॉलो!

World Kidney Day : क्रोनिक किडनी डिजीजमध्ये आहार ठरतो महत्त्वाचा, ही डाएट करू शकता फॉलो!

googlenewsNext

(Image Credit : Health Europa)

किडनी ही आपल्या शरीरातील महत्त्वपूर्ण अंग आहे. खराब लाइफस्टाइल आणि एखाद्या औषधाच्या दुष्परिणामामुळे अनेकदा किडनीमध्ये समस्या होऊ शकते. अशा स्थिती फार सांभाळून राहण्याची गरज असते. किडनी म्हणजेच मूत्रपिंडे अशुद्ध रक्‍त शुद्ध करण्याचे काम करत असतात. मूत्रपिंडात आलेल्या रक्तातून उत्सर्जक पदार्थ निराळे काढले जातात व ते मूत्र मार्गातून विसर्जित होतात. या शिवाय त्यात ‘डी-३‘ हे जीवनसत्त्व आणि एरिथ्रोपोइटिन-दोन नावाचे संप्रेरक तयार होते. ड जीवनसत्त्व मानवी शरीरातल्या कॅल्शियमचे संतुलन ठेवण्यासाठी लागते. एरिथ्रोपोइटिनमुळे रक्ताच्या लाल पेशी तयार होतात.

हे होतं नुकसान

किडनी फेस झाल्यावर रुग्णाने पाणी, मीठ, पोटॅशिअमयुक्त खाद्य पदार्थ इत्याही सामान्य प्रमाणात घेतल्याने अनेकदा गंभीर समस्या होऊ लागते. किडनी फेल्युअरच्या रुग्णांमध्ये सक्षम किडनीवरील अधिक ओझं कमी करण्यासाठी तसेच शरीरात पाणी, मीठ आणि क्षारयुक्त पदार्थांचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात आवश्यक बदल करणे गरजेचं आहे. 

हेल्दी डाएटचा फायदा

काळजीपूर्वक हेल्दी डाएट घेतल्याने कमजोर होत असलेल्या किडनीवर ओझं कमी होतं. ज्यामुळे त्यांचं लाइफ आणखी वाढतं. जर आहार योग्यप्रकारे फॉलो केला गेला तर किडनी संबंधी समस्यांपासून बचाव केला जाऊ शकतो. 

ही डाएट करा फॉलो

thehealthsite.com ने दिलेल्या माहितीनुसार कमी प्रमाणात पाणी प्यावं - अशा स्थितीमध्ये डॉक्टर पाणी आणि तरल पदार्थ कमी घेण्याचा सल्ला देतात. याने किडनीवर अतिरिक्त भार पडत नाही. किडनीच्या रुग्णांना रोज त्यांचं वजन करण्याचा सल्ला दिला जातो. कारण ज्या दिवशी वजन जास्त असेल त्या दिवशी समजून घ्या की, शरीरात तरल पदार्थ जास्त झाले आहेत. 

कार्बोहायड्रेट्स - शरीराला योग्य प्रमाणात कॅलरी मिळाव्यात. त्यासाठी धान्य आणि डाळींसोबत शुगर(जर डायबिटीज नसेल तर) किंवा ग्लूकोजचं अधिक प्रमाण असलेल्या पदार्थांचं सेवन केलं जाऊ शकतं. 

प्रोटीन - दूध, डाळी, धान्य यात भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळतात. जेव्ह डायलिसिसची गरज नसते, त्यावेळी किडनी फेल्युअरच्या रुग्णांना कमी कमी प्रोटीन घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र सामान्य स्थितीमध्ये शरीराला योग्य प्रमाणात प्रोटीन मिळणे गरजेचं असतं. 

मीठ - जास्तीत जास्त रुग्णांना मीठ कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. जेवणात वरून मीठ न घेण्याचं सांगितलं जातं. तसेच आहारातून खाण्याचा सोडा, बेकिंग पावडर असलेले पदार्थ कमी घ्यावेत. काही लोकांना मीठाऐवजी सैंधव मिठाचा वापर करण्यास सांगितलं जातं. 

धान्य - धान्यात तांदूळ किंवा त्यापासून तयार पोहो, मुरमुरे यांसारख्या पदार्थांचा वापर केला पाहिजे. दररोज एकाच धान्यापासून तयार पदार्थ खाण्यापेक्षा वेगवेगळ्या धान्याचे पदार्थ खावेत. ज्वारी, मका, बाजरा यांचाही यात समावेश असावा.

डाळी - वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी योग्य प्रमाणात घेतल्या जाऊ शकतात. ज्यामुळे वेगवेगळे पौष्टीक तत्त्व मिळतात. डाळीतील पोटॅशिअम काढून टाकण्यासाठी ती आधी धुवून घेतल्यावर गरम पाण्यात भिजवून ठेवावी. हे पाणी फेकून द्यावं. 

फळं - फळांमध्ये कमी पोटॅशिअम असलेली फळं जसे की, सफरचंद, पपई, बोरं इत्याही दिवसातून एकदाच खावीत. डायलिसिसच्या दिवशी यातील कोणतही एक फळं खाऊ शकता. नारळाचं पाणी किंवा कोणतही ज्यूस घेऊ नये. 

Web Title: World Kidney Day: Very important in chronic kidney disease taking care of the food these diets can follow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.