किडनी खराब करणारे फूड्स जे आपण रोज खातो, जास्त खाणं पडू शकतं महागात!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 12:17 PM2024-03-14T12:17:30+5:302024-03-14T12:18:06+5:30

World Kidneys Day: आपण रोज खात असलेल्या अनेक पदार्थांमुळेही खराब होतात. चुकीचं खाणं-पिणं आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे किडन्यांना अनेक प्रकारच्या समस्या होतात.

World Kidneys Day: Worst foods for your kidney avoid these foods | किडनी खराब करणारे फूड्स जे आपण रोज खातो, जास्त खाणं पडू शकतं महागात!

किडनी खराब करणारे फूड्स जे आपण रोज खातो, जास्त खाणं पडू शकतं महागात!

World Kidneys Day: किडनी आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे हे सगळ्यांना माहीत असतं. पण अनेकांच्या मनात एकच समज असतो की, किडनी केवळ दारूमुळे खराब होतात. पण हा समज चुकीचा आहे. किडनी केवळ दारूमुळे नाही तर आपण रोज खात असलेल्या अनेक पदार्थांमुळेही खराब होतात. चुकीचं खाणं-पिणं आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे किडन्यांना अनेक प्रकारच्या समस्या होतात.

किडन्यांचं काम

किडनी आपल्या शरीरातील रक्त साफ करतात आणि शरीरातील विषारी तत्व लघवीच्या माध्यमातून बाहेर काढण्याचं काम करतात. पण जर किडन्यांची योग्य ती काळजी घेतली गेली नाही तर अनेक समस्या होतात. अशात आपण काय खातो आणि काय पितो याची खूप काळजी घ्यावी लागते. अशात वर्ल्ड किडनी डे निमित्त आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबाबत सांगणार आहोत ज्यामुळे किडनीचं नुकसान होऊ शकतं.

किडनीचं नुकसान करणाऱ्या गोष्टी

1) मीठ

मिठाचं सेवन आपण रोज वेगवेगळ्या माध्यमातून करत असतो. पण मिठाचं जास्त सेवन करणं फार नुकसानकारक ठरू शकतं. मिठात सोडिअम जास्त असतं, जे पोटॅशिअमसोबत मिळून शरीरात तरल पदार्थाचं प्रमाण योग्य ठेवतं. पण जर मिठाचं जास्त सेवन करत असाल तर फ्लूईचं प्रमाण वाढतं. ज्याने किडनीवर जास्त दबाव पडतो आणि नुकसान होतं.

2) डेअरी प्रॉडक्ट्स

डेअरी प्रॉडक्ट्सही आपल्या रोजच्या जीवनाचा भाग आहेत. दूध, चीज, पनीर, बटरसारखे डेअरी प्रॉडक्ट्सचं आपण नेहीच सेवन करतो. पण यांचं जास्त सेवन केलं तर किडनीचं नुकसान होऊ शकतं. डेअरी प्रॉडक्ट्समध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं. ज्याने किडनीला नुकसान पोहोचतं. डेअरी प्रॉडक्ट्समध्ये कॅल्शिअमही जास्त प्रमाणात असतं. ज्याने किडनी स्टोनची समस्या होऊ शकते. त्यामुळे यांचं जास्त सेवन टाळलं पाहिजे.

3) रेड मीट

बरेच लोक नियमितपणे रेड मीटचं सेवन करतात. रेड मीटरमध्ये प्रोटीन फार जास्त असतं. प्रोटीन आपल्या शरीरासाठी गरजेचंही असतं. पण अशाप्रकारचं मांस पचवणं आपल्या शरीरासाठी अवघड असतं. यामुळे किडनीवर दबाव पडतो आणि किडनीचं काम बिघडतं.

4) आर्टिफिशियल स्वीटनर

बाजारात मिळणाऱ्या मिठाई, कुकीज आणि ड्रिंक्समध्ये आर्टिफिशिअल स्वीटनर जास्त प्रमाणात असतं. जे किडनीच्या आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. जे लोक डायबिटीसचे रूग्ण आहेत, त्यांना किडनीसंबंधी आजार होण्याचा धोका जास्त राहतो. अशा लोकांनी याचं सेवन करू नये.

किडनी खराब झाल्याची सुरूवातीची लक्षणं

- भूक कमी लागणे

- शरीरावर सूज

- जास्त थंडी वाजणे

- त्वचेवर रॅशेज

- लघवी करताना त्रास

- चिडचिडपणा

Web Title: World Kidneys Day: Worst foods for your kidney avoid these foods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.