जागतिक मलेरिया दिवस : मलेरियाची काळजी घ्या, नाहीतर ठरू शकतो जीवघेणा ; पाच वर्षात ७८ मृत्यू, ७२,७६६ रुग्ण

By संतोष आंधळे | Published: April 24, 2024 08:28 PM2024-04-24T20:28:41+5:302024-04-24T20:33:36+5:30

डासाच्या चाव्यामुळे होणार मलेरिया हा आजार असून ॲनाफिलीस डासाच्या प्रजातीमधील मादी डासामुळे होतो.  ही मादी डास साठलेल्या पाण्यामध्ये वास्तव्य करुन अंडी घालत

World Malaria Day: Take care of malaria, otherwise it can be fatal; 78 deaths, 72,766 patients in five years | जागतिक मलेरिया दिवस : मलेरियाची काळजी घ्या, नाहीतर ठरू शकतो जीवघेणा ; पाच वर्षात ७८ मृत्यू, ७२,७६६ रुग्ण

जागतिक मलेरिया दिवस : मलेरियाची काळजी घ्या, नाहीतर ठरू शकतो जीवघेणा ; पाच वर्षात ७८ मृत्यू, ७२,७६६ रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई :  गेल्या काही वर्षात शहरात इमारतीचे बांधकाम आणि रस्त्याची डागडुजी याचे काम वर्षभर कायम सुरु असते. यामुळे विशेष करून पावसाळ्यात या आजराच्या रुग्णाची संख्या वाढते. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षात  या आजरामुळे ७८ रुग्णांचा मृत्यू झाला असून ७२ हजारापेक्षा अधिक रुग्णांना याची लागण झाली आहे.  हा आजार झाल्यानंतर त्याची वेळीच काळजी घेणे गरजचे आहे. अन्यथा गुंतागुत निर्माण हा आजार जीवघेणा ठरत असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

डासाच्या चाव्यामुळे होणार मलेरिया हा आजार असून ॲनाफिलीस डासाच्या प्रजातीमधील मादी डासामुळे होतो.  ही मादी डास साठलेल्या पाण्यामध्ये वास्तव्य करुन अंडी घालत असल्यामुळे या आजराचा  त्रास होऊ नये म्हणून या डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट केली करून परिसर स्वच्छ ठेवाणे गरजेचे आहे. या आजारांमध्ये  रुग्णाच्या शरीरात रक्तामधील प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होत जाते. काही वेळा उपचाराचा भाग म्हणून बाहेरून सुद्धा प्लेटलेस दिल्या  जातात.
   
जागतिक आरोग्य संघटने दरवर्षी २५ एप्रिल हा जागतिक मलेरिया दिवस साजरा केला जातो. मलेरिया आजाराच्या जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.

बचाव कसा कराल ?

लहाने मुले आणि गर्भवती स्त्रिया यांना या आजाराचा धोका सर्वात जास्त प्रमाणात असतो. कारण या दोघांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. विशेष करून संध्याकाळी मलेरियाचे डास चावतात. डास एका जागी बसू नये म्हणून घरात पंखा, एसीचा वापर करावा, तसेच संध्याकाळच्या वेळेत दरवाजे बंद असावेत. तसेच खिडक्यांना जाळ्या बसून घ्याव्यात, असे डॉक्टर सांगतात. तसेच डास मारण्याच्या औषधाचा वापर करावा. झोपताना संपूर्ण अंगभर कपडे घालून झोपावे, त्यामुळे डास चावणार नाहीत. तसेच झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा.

लक्षणे
ताप, अंगदुखी, डोकेदुखी आणि थंडी वाजणे, खूप ताप येणे.
मलेरियाचा डास चावल्यानंतर १०-१५ दिवसांत ही लक्षणे दिसतात.

मलेरियामध्ये चार प्रकार आहेत. त्यानुसार आपण औषधे रुग्णांना देतो. मलेरिया सुरुवातीच्या काळात व्यवथित उपचार घेतला तर पूर्णपणे बरा होऊ शकतो. मलेरियाच्या अधिक गुंतागुंतीमुळे त्याचा परिणाम शरीरावरील विविध अवयवांवर होऊन तो रुग्ण मृत पावल्याच्या घटना घडतात. विशेष करून मलेरियाचा यकृत, फुफ्फुस, मेंदूवर परिणाम होतो. मलेरियावरील चांगली औषधे बाजारात आहेत. त्याचा योग्य वेळी वापर केला पाहिजे. तसेच काही वेळा रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखलही करावे लागते. आजूबाजूच्या परिसरात डासांची उत्पत्ती होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.
- डॉ मधुकर गायकवाड, सहयोगी प्राध्यापक, औषध वैद्यक शास्त्र, सर जे. जे. रुग्णालय.


गेल्या पाच वर्षातील राज्यातील मलेरिया रुग्णांची नोंद

वर्ष-------रुग्ण नोंद---------- मृत्यू  
२०१९----८८६६---------------७
२०२०----१२९०९-------------१२
२०२१----१९३०३-------------१४
२०२२---१५४५१-------------२६
२०२३---१६१५९--------------१९
२०२४---२०३८----------------०
(मार्च )

Web Title: World Malaria Day: Take care of malaria, otherwise it can be fatal; 78 deaths, 72,766 patients in five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.