Menstrual Hygiene Day: मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेकडे दुर्लक्षं करणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 01:45 PM2019-05-28T13:45:21+5:302019-05-28T13:50:28+5:30
मेंस्ट्रुअल सायकल, मासिक पाळी किंवा पिरियड्स.... काहीही म्हणा पण अर्थ एकच. मुलगी वयात आल्यानंतर तिच्यामध्ये सुरू होणारी एक नैसर्गिक क्रिया. पण अजुनही अनेक लोकांच्या मनात या गोष्टीबाबत अनेक समज-गैरसमज आहेत.
(Image Credit :Medical News Today)
मेंस्ट्रुअल सायकल, मासिक पाळी किंवा पिरियड्स.... काहीही म्हणा पण अर्थ एकच. मुलगी वयात आल्यानंतर तिच्यामध्ये सुरू होणारी एक नैसर्गिक क्रिया. पण अजुनही अनेक लोकांच्या मनात या गोष्टीबाबत अनेक समज-गैरसमज आहेत. अनेक NGO याबाबत जनजागृती करत असून यासाठी डॉक्युमेंट्री आणि चित्रपटांचाही आधार घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी 28 मे रोजी मेंस्ट्रुअल हायजीन डे साजरा करण्यात येतो. अजूनही अनेक गावांमध्ये किंवा खेडोपाड्यांमध्ये मासिक पाळीबाबत अनेक अंधश्रद्धा आहेत. एवढचं नाही तर या दिवसांमध्ये कोणती काळजी घ्यावी याबाबतही अनेक महिलांना काहीच माहीत नाही.
मासिक पाळीच्या दिवसांमध्येमहिलांना पर्सनल हायजिनची काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं. या दरम्यान जर साफ-सफाई आणि स्वच्छतेकडे दुर्लक्षं केलं तर यामुळे शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. एवढचं नाही तर यामुळे अनेक गंभीर आजार होण्याचाही धोका असतो.
(Image Credit : Study Breaks Magazine)
डर्मेटॅटिस (dermatitis)
मेंस्ट्रुअल दरम्यान जर हायजिनबाबत लक्ष नाही ठेवलं तर स्किन इरिटेशन होऊ शकतं. ज्यामुळे dermatitis होऊ शकतं. हा एक असा आजार आहे, ज्यामध्ये स्किनला इन्फेक्शन होऊन सूजही येते. त्वचा लाल होते आणि अनेकदा पिंपल्ससारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.
यूटीआई (UTI) चा धोका
जर यूरेथ्रा मध्ये बॅक्टेरियाचा प्रवेश झाला तर यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजेच यूटीआयचा धोका वाढतो. हा एक अत्यंत गंभीर आजार आहे कारण जर यूटीआयवर वेळीच उपचार केले नाही तर यामुळे किडनीही डॅमेज होऊ शकते.
(Image Credit : Medical News Today)
वजायनाला नुकसान
हानिकारक बॅक्टेरिया वेगाने वाढू लागला तर यामुळेही जेनिटल ट्रॅक्टच्या भागामध्ये इन्फेक्शनचा धोका वाढतो आणि यामुळेही वजायनाला नुकसान होऊ शकतं.
सर्वाइकल कॅन्सरचा धोका
यूटीआय आणि रिप्रॉडक्टिव ट्रॅक्ट इन्फेक्शनच्या कारणामुळे सर्वाइकल कॅन्सरचा धोका अनेक पटिंनी वाढतो. हा यूट्रसमध्ये असणाऱ्या सर्विक्सचा कॅन्सर असतो. जो एचपीवी वायरसमुळे होतो.
वंध्यत्वाचा धोका
मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेकडे दुर्लक्षं केलं तर महिलांमध्ये वंधत्वाचा धोका वाढतो.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवणार आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतं.