वर्ल्ड मिल्क डे : थंड दूध पिण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2018 12:17 PM2018-06-01T12:17:52+5:302018-06-01T12:17:52+5:30

दूध पिण्याचे फायदे अनेक आहेत. पण त्यातल्या त्यात थंड दूध पिण्याचे आणखी जास्त फायदे आहेत. चला जाणून घेऊया थंड दूध पिण्याचे फायदे....

World Milk Day: Healthy benefits of drinking cold milk | वर्ल्ड मिल्क डे : थंड दूध पिण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे!

वर्ल्ड मिल्क डे : थंड दूध पिण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे!

Next

मुंबई : आज वर्ल्ड मिल्क डे आहे. दूध हे आपल्या आरोग्यासाठी किती फायद्याचं आहे हे तुम्हाला माहीत आहेच. पण असेही काही लोक आहेत ज्यांना दूध अजिबात आवडत नाही. दूध पिण्याचे फायदे अनेक आहेत. पण त्यातल्या त्यात थंड दूध पिण्याचे आणखी जास्त फायदे आहेत. चला जाणून घेऊया थंड दूध पिण्याचे फायदे....

1) थंड दूधामुळे गॅस होत नाही. अन्नपचनास मदत होते. यामुळे फॅट्स, तूप आणि तेल याचे चांगले पचन होते. 

2) थंड दूध प्यायल्याने अॅंसिडीटी, जाडेपणा, सतत भूक लागणे यांसारख्या समस्या दूर होतात. इतकेच नाहीतर जेव्हा तुम्ही थकलेले असता तेव्हा थंड दुधामुळे तुम्हाला एनर्जी मिळते.

3) अॅसिडिटी दूर करण्यासाठी आणि पेप्टिक अल्सरमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी थंड दूध पिणे फायदेशीर ठरते.

4) जेवल्यानंतरही तुम्हाला सारखी भूक लागत असेल तर तुम्ही थंड दूध पिणे हा उत्तम उपाय आहे. थंड दूधात ओट्स मिसळूनही तुम्ही खावू शकता.

5) थंड दूधात इलेक्ट्रोलाईट्स असतात. त्यामुळे डिहाड्रेशनपासून बचाव होतो. दिवसातून दोनदा थंड दूध प्यायल्यास तुम्ही नेहमी हाडड्रेट रहाल. दूध पिण्याची सर्वात उत्तम वेळ म्हणजे सकाळची.

6) थंड दूध प्यायल्याने शरीराला ते नॉर्मल तापमानाला येण्यासाठी कॅलरीज बर्न कराव्या लागतील आणि त्यानंतर त्याचे पचन होईल. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.

7) व्यायामानंतर थंड दूध पिणे लाभदायी ठरते. यात मसल्ससाठी आवश्यक प्रोटीन्स असतात. तसंच दूधामुळे शरीराला ऊर्जा मिळते.

8) चेहऱ्यावर थंड दूध लावल्याने त्वचा स्वच्छ होते. तसंच त्वचा हाडड्रेट आणि मुलायम होते.

9) थंड दूध प्यायल्याने चेहऱ्यावरील काळे डाग दूर होतात आणि चेहरा उजळतो. दूधात व्हिटॅमिन ए आणि अॅंटीऑक्सीडेंट्स अधिक प्रमाणात असतात. याचा त्वचेसाठी खूप फायदा होतो. यामुळे त्वचेवर ग्लो येतो.

10) थंड दूध प्यायल्याने तुमच्य़ा पायांना पडलेल्या भेगाही दूर होतात. दूधात असलेल्या लॅटिक अॅसिड मृत कोशिकांना वेगळं करुन नवीन कोशिका तयार करतात. 

11) कोमट दूध प्यायल्याने झोप चांगली येते. कारण दूधात अमिनो अॅसिड ट्रिप्टोफन असते. पण थंड दूधामुळे हा त्रास होत नाही. उलट दूधातील पोषकघटक मिळतील.

Web Title: World Milk Day: Healthy benefits of drinking cold milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.