World tobacco Day- तंबाखु सेवनाचे धोके वेळीच ओळखा! दरवर्षी ८० लाख लोकांचा मृत्यू-WHO ची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 11:42 AM2022-05-31T11:42:12+5:302022-05-31T11:50:56+5:30

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, दरवर्षी जगभरात सुमारे ८० लाख लोक तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारांमुळे मृत्युमुखी पडतात. या कारणास्तव, या विशेष दिवशी जनतेला तंबाखू सेवनाचे धोके, तंबाखू कंपन्यांच्या व्यवसाय पद्धती, WHO योजना इत्यादींबद्दल माहिती दिली जाते.

World No Tobacco Day- Every year more than 8 million die from tobacco, says UN | World tobacco Day- तंबाखु सेवनाचे धोके वेळीच ओळखा! दरवर्षी ८० लाख लोकांचा मृत्यू-WHO ची माहिती

World tobacco Day- तंबाखु सेवनाचे धोके वेळीच ओळखा! दरवर्षी ८० लाख लोकांचा मृत्यू-WHO ची माहिती

googlenewsNext

जागतिक तंबाखू विरोधी दिन (World no Tobacco Day 2022) दरवर्षी ३१ मे रोजी साजरा केला जातो. या विशेष दिवशी तंबाखूच्या धोक्यांबद्दल जगभरात जनजागृती केली जाते. तंबाखू खाणे शरीराला किती हानीकारक आहे, याची माहिती या विशेष दिवशी जगभरात देण्यात येत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, दरवर्षी जगभरात सुमारे ८० लाख लोक तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारांमुळे मृत्युमुखी पडतात. या कारणास्तव, या विशेष दिवशी जनतेला तंबाखू सेवनाचे धोके, तंबाखू कंपन्यांच्या व्यवसाय पद्धती, WHO योजना इत्यादींबद्दल माहिती दिली जाते.

इतिहास काय आहे -
जागतिक तंबाखूजन्य संकट, साथीचे रोग आणि मृत्यूची वाढती प्रकरणे लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने १९८७ मध्ये पहिला 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' साजरा केला. 1987 मध्ये, जागतिक आरोग्य सभेने WHA40.38 ठराव पारित केला, ज्यामध्ये ७ एप्रिल हा "जागतिक धूम्रपान निषेध दिवस" ​म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव होता. यानंतर १९८८ मध्ये WHA42.19 हा ठराव पारित करण्यात आला, ज्यामध्ये ३१ मे हा दिवस 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' म्हणून जारी करण्यात आला. तेव्हापासून या दिवशी जगभरातील लोकांमध्ये तंबाखूचे घातक परिणाम आणि त्याचे सेवन याबाबत जनजागृती केली जात आहे.

जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे महत्व -
'जागतिक तंबाखू विरोधी दिन' साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे तंबाखूचे धोके आणि त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबद्दल लोकांमध्ये जागृती करणे. एवढेच नाही तर निकोटीनच्या वापरामुळे आणि तंबाखूच्या सेवनामुळे होणारे आजार आणि मृत्यू कमी करणे, हा देखील उद्देश आहे.

यावेळची थीम काय -
यावेळी 'जागतिक तंबाखू विरोधी दिन'ची थीम आहे- 'पर्यावरणाचे रक्षण करा'. गेल्या वर्षी या दिवसाची थीम 'कमिट टू क्विट' होती.

Web Title: World No Tobacco Day- Every year more than 8 million die from tobacco, says UN

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.