World Organ Donation Day 2018 : अवयवदानाबाबत समाजात असलेले समज, गैरसमज!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 03:27 PM2018-08-13T15:27:20+5:302018-08-13T15:27:32+5:30
दान करणं हे सर्वात मोठं काम असतं असं आपण नेहमी ऐकतो. आपल्या धार्मिक ग्रंथांमधूनही आपल्याला दानशूरपणाची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. त्यातील एक उदाहरण म्हणजे कर्ण.
दान करणं हे सर्वात मोठं काम असतं असं आपण नेहमी ऐकतो. आपल्या धार्मिक ग्रंथांमधूनही आपल्याला दानशूरपणाची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. त्यातील एक उदाहरण म्हणजे कर्ण. कर्णाला सर्वश्रेष्ट दाता असं म्हटलं जातं. असचं एक दान म्हणजे अवयव दान. 13 ऑगस्ट हा दिवस जगभरामध्ये जागतिक अवयवदान दिवस (World Organ Donation Day) म्हणून ओळखला जातो. अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं. त्यामुळे एखाद्या माणसाला जीवनदान मिळतं. पण या दानाबाबत समाजात अनेक समज आणि गैरसमज पसरलेले आहेत. आज अवयव दिनाच्यानिमित्ताने जाणून घेऊयात या गैरसमजांमागील मागील सत्य काय आहे ते...
- बऱ्याच लोकांना असं वाटतं की, ते अवयव दान करणार आहेत असं हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना समजलं तर ते त्यांना वाचवण्याचा प्रयत्नच करणार नाहीत. पण हा समज अत्यंत चुकीचा आहे. कारण प्रत्येक डॉक्टर रूग्णांचा जीव वाचवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. ते उगाच कोणालाही मरणाच्या दारी पाठवत नाहीत.
- आपल्या शरीराला अनेक व्याधी असतात. असे असताना अवयवदान करू शकत नाही असा प्रत्येकाचा समज असतो. पण हा समज अत्यंत चुकीचा असून प्रत्येकजण अवयदान करू शकतात.
- वृद्ध माणसांना अवयव दान करता येत नाही असं अनेक जणांना वाटतं पण हा समज अत्यंत चुकीचा आहे. अवयव दान करण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही. फक्त अवयवांचं सुदृढ असणं गरजेचं असतं.
- अवयव दान करण्यासाठी कोणताही खर्च येत नाही. अनेक जणांचा असा समज आहे की, अवयव दान करणासाठी फार मोठा खर्च करावा लागतो.
- अवयवदान केल्यानंतर कोणीही तुमचा कोणताही अवयव विकू शकत नाही. असे कोणी करत असेल तर कायद्याने त्यांना कडक शिक्षा होऊ शकते.
- जर एखादी व्यक्ती कोमामध्ये असेल तर ती व्यक्ती अवयवदान करू शकत नाही असा अनेक जणांचा समज असतो. एका संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, अवयवदान करणाऱ्या लोकांमध्ये सर्वात जास्त संख्या ब्रेन डेड असणाऱ्या लोकांची आहे. त्यामुळे जर ब्रेन डेड झालेली लोकं अवयव दान करू शकतात तर कोमात गेलेली लोकंही नक्कीच अवयव दान करू शकतात.
- अवयवदान करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीचं सेक्शुअल ओरिंअंट नाही तर त्या व्यक्तिच्या शरीराचं सुदृढ असणं गरजेचं असतं. त्यामुळे एलजीबीटी कम्युनिटी असणारी लोकंही अवयव दान करू शकतात.