फार लवकर येतो का थकवा? 'या' आजाराचा संकेत असू शकतं हे लक्षण....
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 11:49 AM2022-05-25T11:49:52+5:302022-05-25T11:51:14+5:30
World Thyroid Day 2022 : थायरॉइड फुलपाखराच्या आकाराची एक ग्रंथी असते. जी गळ्यात असते. ही ग्रंथी एक हार्मोन तयार करते ज्याने मेटाबॉलिज्म कंट्रोलमध्ये राहतो.
World Thyroid Day 2022 : दरवर्षी २५ मे रोजी जगभरात वर्ल्ड थायरॉइड डे साजरा केला जातो. या दिवशी लोकांना थायरॉइडबाबत जागरूक केलं जातं. थायरॉइड ग्लॅंड योग्य प्रकारे काम न केल्याने वेगवेगळ्या समस्या होतात. सामान्यपणे ६० पेक्षा जास्त वय असलेल्या महिलांना थायरॉइडची समस्या जास्त होऊ लागते. थायरॉइड फुलपाखराच्या आकाराची एक ग्रंथी असते. जी गळ्यात असते. ही ग्रंथी एक हार्मोन तयार करते ज्याने मेटाबॉलिज्म कंट्रोलमध्ये राहतो. जेव्हा हार्मोनचा स्तर फार जास्त किंवा कमी होतो, तेव्हा शरीरात अनेक प्रकारची लक्षणं दिसू लागतात.
वजन जास्त वाढणं किंवा कमी होणं - वजनात बदल होणे थायरॉइड डिसऑर्डरचं सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक आहे. वजन वाढलं तर थायरॉइड हार्मोन कमी होण्याचा संकेत आहे. ज्याला हायपोथायरायडिज्म असं म्हणतात. तेच जर थायरॉइड शरीरात जास्त हार्मोन बनवत असेल तर फार जास्त वजन कमी होऊ लागतं. याला हायपरथायरायडिज्म म्हणतात.
गळ्यावर सूज - गळ्यावर यूज येणे हा थायरॉइडमध्ये गडबड झाल्याचा संकेत आहे. यात गळ्यात गॉयटर म्हणजे गण्डमाळा बनते. हे हापोथायरायडिज्म किंवा हायपरथायरायडिज्म दोन्ही होऊ शकतं. कधी कधी गळ्यावरील सूज थायरॉइड कॅन्सर किंवा गाठीमुळेही येऊ शकते.
हृदयाच्या गतीत बदल - थायरॉइड हार्मोन शरीराच्या जवळपास प्रत्येक अंगावर प्रभाव पाडतात. यामुळे हृदयाच्या गतीमध्येही बदल येऊ शकतो. हायपोथायरायडिज्म असणाऱ्या लोकांच्या हृदयाची गती सामान्यापेक्षा कमी होते तर हायपरथायरायडिज्ममुळे ही गती वाढते. याने ब्लड प्रेशरही वाढतं.
एनर्जी आणि मूडमध्ये बदल - थायरॉइड डिसऑर्डरचा एनर्जी लेव्हल आणि मूडवरही फार जास्त प्रभाव पडतो. हायपोथारायडिज्ममध्ये लोकांना थकवा, सुस्ती आणि निराशा जाणवते. हायपरथायरायडिज्ममुळे चिंता, झोप ने येणे, अस्वस्थता आणि चिडचिड होते.
केसगळणे - केसगळती थायरॉइड हार्मोन असंतुलित होण्याचा आणखी एक संकेत आहे. ही समस्या हायपोथायरायडिज्म आणि हायपरथायरायडिज्म दोघांमध्येही दिसते. जास्तीत जास्त केसेसमध्ये थायरॉइड डिसऑर्डरवर उपचार घेतल्यावर केस पुन्हा येतात.
जास्त थंडी किंवा उष्णता जाणवणे - हायपोथायरायडिज्ममध्ये कोरडी त्वचा आणि तुटलेली नखे, हात-पाय सुन्न होणे, जुलाब, असामान्य मासिक पाळी सारखी लक्षणे दिसतात. तेच हायपरथायरायडिज्मच्या असामान्य लक्षणांमध्ये मांसपेशींमध्ये कमजोरी किंवा हात थरथरणे, डोळ्यांची समस्या इत्यादी दिसतात.