World Water Day 2019 : तुम्हालाही पाणी पिण्याचे 'हे' नियम माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 02:14 PM2019-03-22T14:14:04+5:302019-03-22T14:14:51+5:30

पाणी म्हणजे जीवन... आपल्या शरीरामध्ये 60 टक्के पाणी असते. शरीरातील विविध कामांसाठी पाणी फायदेशीर ठरतं.

World Water Day 2019 You must know the essential rules for drinking water | World Water Day 2019 : तुम्हालाही पाणी पिण्याचे 'हे' नियम माहीत आहे का?

World Water Day 2019 : तुम्हालाही पाणी पिण्याचे 'हे' नियम माहीत आहे का?

Next

पाणी म्हणजे जीवन... आपल्या शरीरामध्ये 60 टक्के पाणी असते. शरीरातील विविध कामांसाठी पाणी फायदेशीर ठरतं. द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, शरीरामध्ये लाळ निर्मिती, पचन, शोषण, रक्ताभिसरण, पोषक तत्त्वांचे परिवहन, शरीरातील तापमानाचे व्यवस्थापन, चयापचयातील विषारी पदार्थाचे विसर्जन इत्यादी क्रिया होण्यासाठी पाणी अत्यावश्यक असते. आरोग्य उत्तम राखण्यासाठी जसं स्वच्छ पाणी पिणं अत्यंत आवश्यक असतं. त्याचप्रमाणे योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पाणी पिणं गरजेचं असतं. आज जागतिक जलदिनाच्या निमित्ताने जाणून घेऊया पाणी पिण्याच्या काही नियमांबाबत...

का आवश्यक असतं पाणी?

पाणी आपली पचनक्रिया व्यवस्थित करण्यासाठी मदत करतं. त्याचबरोबर हानिकारक तत्व शरीराबाहेर टाकण्याचंही काम करतं. हे शरीराची नैसर्गिक ड्रेनेज सिस्टम तयार करतं. जर तुम्ही दररोज योग्य प्रमाणात पाणी पित असाल तर यामुळे तुम्ही स्वतःच अनेक आजारांपासून बचाव करू शकता. 

जाणून घ्या पाणी पिण्याचे काही नियम :

  • सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी एक ग्लास पाणी प्या. 
  • जेवण्याच्या एक तास अगोदर एक ग्लास पाणी.
  • दिवसभरामध्ये 8 ते 9 ग्लास पाणी प्यावं. 
  • उभं राहून पाणी पिणं टाळावं, त्यामुळे सांधेदुखीचा त्रास होतो. 
  • फळं खाल्यानंतर पाणी पिणं टाळा. याव्यतिरिक्त गरम अन्नपदार्थ. फळं जसं काकडी, टरबूज आणि कलिंगड खाल्यानंतर पाणी पिणं शक्यतो टाळावं. 

 

पाणी प्या आणि आजार दूर ठेवा

पोटाच्या समस्या राहतात दूर

दररोज सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत होते. ज्यामुळे बद्धकोष्ट, अॅसिडीटी आणि पोटाच्या वेदना यांसारख्या समस्या दूर होतात. 

लिव्हर आणि किडनीसाठी फायदेशीर

सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने स्किन, लिव्हर, किडनी आणि डोळांच्या समस्या दूर होतात. याव्यतिरिक्त शरीर निरोगी ठेवण्यासाठी दिवसभरामध्ये भरपूर पाणी प्या.
 
डोकेदुखी दूर होण्यासाठी

संशोधकांनुसार, डोकेदुखीचा त्रास होणाऱ्या 90 टक्के रूग्णांमध्ये शरीरामध्ये असणार पाण्याची कमतरता हे कारण असतं. त्यामुळे दिवसभरामध्ये कमीतकमी 8 ते 10 ग्लास पाणी पिणं गरजेचं असतं. 

ग्लोइंग स्किन 

पाणी प्यायल्याने त्वचेमध्ये असलेले विषारी टॉक्सिंस निघून जातात. त्याचबरोबर त्वचा मुलायम आणि चमकदार होण्यास मदत होते. एवढचं नाही तर, जर तुम्ही भरपूर प्रमाणात पाणी प्यायलात तर त्यामुळे त्वचेच्या इतरही अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. 

रोगप्रतिकार शक्ती 

पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी तत्व घाम आणि युरिनवाटे निघून जाण्यास मदत होते. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकाक क्षमता वाढते. वढचं नाही तर वजनही नियंत्रणात राहतं. 

सुस्ती दूर होण्यासाठी

तुम्हाला जास्त थकवा जाणवत असेल किंवा सुस्ती आली असेल तर पाणी प्या. यामुळे रक्तामधील लाल रक्त पेशींमुळे अधिक ऑक्सिजन आणि उर्जा मिळते. आयुर्वेदानुसार, पाणी नेहमी सावकाश आणि घोट घेऊन पिणं गरजेचं असतं. यामुळे पाणी बॉडि टेंप्रेचरनुसार शरीरामध्ये पोहोचतं. 

हार्ट अटॅकचा धोका होतो कमी

झोपण्यापूर्वी पाणी पिण्याची सवय आरोग्यासाठी उत्तम ठरतं. त्यामुळे दररोज झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्या. यामुळे हृदयाचे आरोग्य राखण्यासोबतच हार्ट अटॅकचा धोकाही कमी होतो. 

हाय ब्लड प्रेशर 

ज्या लोकांना हाय ब्लड प्रेशरच्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर आंघोळीच्या आधी एक ग्लास पाणी पिणं गरजेचं असतं. यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
 
या गोष्टीही लक्षात घ्या :

- एक्सरसाइज केल्यानंतर पाणी प्यावं. कारण यादरम्यान शरीराचं तापमान बदलतं. 

- चिकट किंवा तळलेले पदार्थ खाल्यानंतर पाणी पिणं आरोग्यासाठी घातक ठरतं. याशिवाय शेंगदाणे खाल्यानंतर पाणी पिणं टाळावं. 

- गरम दूध, चहा आणि उन्हातून आल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. असं करणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. 

टिप : वरील सर्व उपाय आम्ही माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतं. 

 

Web Title: World Water Day 2019 You must know the essential rules for drinking water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.