वयानुसार कुणी किती पाणी प्यायला हवं? आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितली योग्य पद्धत आणि वेळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 02:42 PM2024-03-22T14:42:09+5:302024-03-22T14:42:35+5:30
World Water Day : भरपूर पाणी प्यायल्याने त्वचा-शरीर हायड्रेटेड राहतं आणि त्वचा आणखी तरूण दिसते. यामुळे सुरकुत्या कमी होतात आणि त्वचेवर चमकदारपणा येतो.
World Water Day : सध्या उन्हाळा सुरू आहे आणि पाणी भरपूर पिण्याचा सल्ला सगळेच देतात. अशात आज वर्ल्ड वाटर डे (World Water Day) आहे. दरवर्षी 22 मार्चचा हा दिवस पाळला जातो. या दिवशी पाणी पिण्याचं महत्व लोकांना सांगितलं जातं आणि त्याबाबत जागरूकता केली जाते. एका रिपोर्टनुसार, 2.2 अब्ज लोक स्वच्छ पाण्यापासून दूर आहेत.
मनुष्याचं साधारण 70 टक्के शरीर पाण्यापासून बनलेलं असतं. पाणी शरीरातील पेशींना पोषक तत्व देण्याचं आणि शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्याचं महत्वाचं काम करतं. पाण्यात अनेक पोषक तत्व असतात जे शरीर निरोगी ठेवतात. पाण्याशिवाय जगणं याचा विचारच केला जाऊ शकत नाही. त्यामुळे भरपूर पाणी प्यायला हवं.
भरपूर पाणी प्यायल्याने त्वचा-शरीर हायड्रेटेड राहतं आणि त्वचा आणखी तरूण दिसते. यामुळे सुरकुत्या कमी होतात आणि त्वचेवर चमकदारपणा येतो. पाणी किडनीला शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतं.
तुम्हाला कदाचित माहीत नसेल मेंदुचा 73 टक्के भाग पाण्यापासून बनलेला असतो. डिहायड्रेशनमुळे मेंदुची कार्यक्षमता कमी होऊ शकते आणि डोकेदुखीसोबत इतरही समस्या वाढू शकतात. अशात तुम्ही तुमच्या वजनानुसार दिवसातून किती प्यायला पाहिजे हे तुम्हाला माहीत असायला हवं.
रोज किती पाणी प्यावं?
रोज एका व्यक्तीने किती पाणी प्यायला हवं हे वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. जसे की, वजन, वय, लिंह आणि तुम्ही कोणतं काम करता. प्रत्येकासाठी पाण्याचं प्रमाण एकसारखं असू शकत नाही. पण सामान्यपणे एका व्यक्तीने दिवसातून 2 ते 3 लीटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
वयानुसार किती प्यावं पाणी
मेयो क्लीनिकनुसार, एक निरोगी आणि व्यक्तीला प्रति किलोग्राम शरीराच्या वजनासाठी दर दिवसाला जवळपास 35 मिलीलीटर पाण्याची गरज असते. म्हणजे जेवढं जास्त तुमचं वजन असेल तेवढं जास्त पाणी तुम्हाला पावं लागेल.
50 किलो वजन असणाऱ्यांनी रोज जवळपास 1.7 लीटर पाणी प्यावं.
60 किलो वजन असणाऱ्यांनी रोज साधारम 2.1 लीटर पाणी प्यावं.
70 किलो वजन असलेल्या व्यक्तींनी रोज साधारण 2.4 लीटर पाणी प्यावं.
80 किलो वजन असणाऱ्या व्यक्तींनी रोज जवळपास 2.8 लीटर पाणी प्यावं.
शारीरिक मेहनत जास्त असेल तर जास्त पाणी
जे लोक जास्त शारीरिक मेहनतीचं काम करतात किंवा जास्त व्यायाम करतात किंवा उष्ण भागात राहतात त्यांना घाम जास्त जातो. अशात त्यांना जास्त पाणी प्यावं लागतं. शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणी जास्त प्यावं लागतं.
आयुर्वेदातील पाणी पिण्याचे नियम
- भरपूर पाणी पिण्याचे अनेक फायदे होतात. पण पाणी पचवणंही तेवढंच महत्वाचं असतं.
- घाम, बद्धकोष्ठता, तोंड कोरडं पडणे आणि लघवीचा रंग जास्त पिवळा झाला तर जास्त पाणी प्यावे.
- जेवण केल्यावर लगेच पाणी न पिता साधारण 30 मिनिटांनंतर पाणी प्यावे. याने पचन चांगलं होतं.
- वाताने पीडित लोकांनी जेवण केल्यावर 30 मिनिटांनी आणि जास्त वजन असलेल्या लोकांनी जेवणाच्या 30 मिनिटांआधी पाणी प्यावे.
- उभं राहून पाणी पिणं टाळलं पाहिजे. नेहमीच बसून पाणी प्यावे. तेव्हाच त्याचे फायदे मिळतील.
- पाणी कधीही ढसाढसा किंवा घाईने नाही तर एक एक घोट करून प्यावे.
- फ्रिजमधील थंड पाणी पिणं टाळा. उन्हाळ्यात मातीच्या मडक्यातील पाणी पिल्यास जास्त फायदे मिळतील.
- पाणी स्टोर करण्यासाठी माती किंवा तांब्याच्या भांड्याचा कमी आणि स्टीच्या भांड्याचा जास्त वापर करा.