जगातील सर्वात विषारी झाडं; चुकूनही हात लागला तर मृत्यू अटळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 01:12 PM2018-10-22T13:12:09+5:302018-10-22T13:12:21+5:30
झाडं-झुडपं आणि फुलं-पानं सर्वांनाच आवडतात. झाडं फक्त ऑक्सिजनच देत नाही तर वातावरण अनुकूल ठेवण्यासाठीही मदत करतात. तसेच अनेक व्याधींवर उपाय म्हणूनही झाडं आणि पानाफुलांचा वापर करण्यात येतो.
झाडं-झुडपं आणि फुलं-पानं सर्वांनाच आवडतात. झाडं फक्त ऑक्सिजनच देत नाही तर वातावरण अनुकूल ठेवण्यासाठीही मदत करतात. तसेच अनेक व्याधींवर उपाय म्हणूनही झाडं आणि पानाफुलांचा वापर करण्यात येतो. आपल्या पृथ्वीतलावर अनेक गोष्टी अशा आहेत ज्या विषारी असून मानवी शरीरासाठी घातक ठरतात. त्यामध्ये काही झाडांचाही समावेश होतो. जाणून घेऊया अशा काही झाडांझुडूपांबाबत ज्यांच्या फक्त स्पर्शानेही मानवाचा अथवा एखाद्या प्राणीमात्राचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे या झाडांपासून दूर राहणचं चांगलं ठरतं.
1. Hydnellum peckii
आपण अनेकदा मशरूमचा आपल्या आहारामध्ये समावेश करतो. परंतु सर्वच मशरूम आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात असं नाही. काही मशरूम मानवी शरीरासाठी घातक असतात. जर तुम्हाला असं मशरूम दिसलं ज्यावर रक्तासारखे लाल रंगाचे डाग आहेत, तर त्या मशरूमला चुकूनही हात लावू नका. याप्रकारचे मशरूम यूरोप आणि नॉर्थ अमेरिका फॅसिफिक नॉर्थवेस्टमध्ये आढळून येतात. याची चव अत्यंत कडवट असते. याचं सेवन करणं शरीरासाठी घातक ठरतं. तसेच यामुळे डिहायड्रेशनच समस्याही होऊ शकते.
2. Red Cup Mushroom
मानवी शरीरासाठी हे झाडं अत्यंत हानिकारक असतं. हे दिसायला फार आकर्षक दिसत असलं तरीदेखील यापासून लांब राहणं आपल्यासाठी फायदेशीर ठरतं. नॉर्थ अमेरिकेमध्ये आढळून येणारं हे मशरूम खाल्यानं जीवाला धोका होऊ शकतो.
3. White snakeroot
सुंदर दिसणारं हे फूल अब्राहम लिंकन यांची आई नैन्सी हैंक्स आणि इतर अनेक लोकांच्या मृत्यूचं कारण बनलं आहे. हे फूल अत्यंत विषारी असून गायीच्या दुधामार्फत मानवाच्या शरीरामध्ये जाऊ शकतं. या फूलामध्ये असलेल्या विषारी तत्वांमुळे मृत्यूही होऊ शकतो.
4. Angel’s trumpet
नाव ऐकताच फार सुंदर झाडं असेल असा समज होतो परंतु या झाडापासून लांब राहणंचं फायदेशीर ठरतं. याला चुकूनही स्पर्श झाला तरीदेखील पॅरालिसस, वायलेंट ट्रान्स इत्यादी समस्या होतात. तसेच अनेकदा मृत्यूसुद्धा होतो.
5. Belladonna
या झाडाला डेडली नाइटशेड असंही म्हटलं जातं. काही दिवसांपूर्वी एक अशी बातमी आली होती की, या झाडाला लागणारी बेरी खाऊन एका मुलाचा मृत्यू झाला होता. याच्या झाडाच्या पानांसोबतच फळंही हानिकारक ठरतात.