चिंताजनक! कोरोनामधून बरे झालेल्या मुलांवर नव्या आजाराचं सावट, जाणून घ्या 'हा' गंभीर आजार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 03:36 PM2021-08-13T15:36:18+5:302021-08-13T16:15:01+5:30
वैज्ञानिकांनी नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार कोव्हिड होऊन गेलेल्या १२ वर्षाखालील लहान मुलांमध्ये दुर्मिळ पण गंभीर असा मल्टीसिस्टम इन्फ्लामेट्री सिंड्रोम (एमआयएस-सी) आढळून आला आहे.
वैज्ञानिकांनी नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार कोव्हिड (covid-19) होऊन गेलेल्या १२ वर्षाखालील लहान मुलांमध्ये दुर्मिळ पण गंभीर असा मल्टीसिस्टम इन्फ्लामेट्री सिंड्रोम(multiple inflammatory syndrome ) म्हणजेच एमआयएस-सी (MIS-C)आढळून आला आहे. ताप, डोकेदुखी तसेच हृदय, फुफ्फुसं, किडनी, त्वचा, डोळे इत्यादी अवयवांचा दाह किंवा गॅस्ट्रोइंटेस्टायनल अशी या आजाराची लक्षणे आहेत.
न्यु यार्कमधील माऊंट सिनाई हॉस्पिटलमधील संशोधकांनी (Mount Sinai Hospital in New York, US,) हा दावा केला आहे. या संशोधकांनी केलेल्या रक्तचाचण्यांमध्ये असे समोर आले आहे की, पोस्ट कोव्हिड (post covid)लक्षणांमध्ये लहान मुलांमध्ये संसर्गामुळे रोगप्रतिकारक शक्ती असणाऱ्या पेशी कमी होत जातात. त्याचाच परिणाम म्हणजे, लहान मुलांना एमआयएस-सी होण्याचा धोका वाढतो.
हे संशोधन नेचर कम्युनिकेशनमध्ये प्रसिद्ध झाले असून संशोधकांनी कोरोना झालेल्या लहान मुलांमध्ये एमआयएस-सीची लक्षणं आढळून आली. या सशोंधनामध्ये लक्षात आलेली आणखी एक विशेष बाब म्हणजे, कहा आजार दोन प्रकारच्या इम्युन सेल्सवर हल्ला करतो, एक म्हणजे नॅचरल किलर सेल्स व CD8+ T सेल्स.
संशोधकांच्या म्हणण्यानुसार हे सेल्स हळूहळू कमजोर होत जातात. माउंट सिनाई येथील Icahn स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये जेनेटिक्स आणि जीनोमिक सायन्सचे सहाय्यक प्राध्यापक नोम बॅकमेन यांनी असे म्हटले की, कोरोनामुळे कमी होत असलेल्या रोगप्रतिकारक शक्ती असणाऱ्या पेशी हे लहान मुलांमधील एमआयएस-सीचं प्रमुख कारण आहे.