दातांना जास्त खराब करतात हे 5 पदार्थ, आजपासूनच खाणं सोडा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 11:51 AM2022-10-14T11:51:50+5:302022-10-14T11:51:59+5:30

Worst Foods for Your Teeth: आपल्याला ओरल हेल्थ आणि दातांची काळजी घ्यावी लागते. असं काही खाऊ नये ज्याने दात खराब होतील. चला जाणून घेऊ दात खराब होऊ नये म्हणून आपण काय काय खायला हवं.

Worst foods for teeth sour candies, bread, alcohol, you should know this | दातांना जास्त खराब करतात हे 5 पदार्थ, आजपासूनच खाणं सोडा

दातांना जास्त खराब करतात हे 5 पदार्थ, आजपासूनच खाणं सोडा

googlenewsNext

Worst Foods for Your Teeth: आपण जे काही खातो त्याचं माध्यम आपलं तोंड असतं, जेवण करण्यात आपल्या तोंडाची महत्वाची भूमिका असते. दात अन्न बारीक करण्यात आपली मदत करतात. जेणेकरून डायजेशन चांगलं व्हावं. नाही तर पोटात गडबड होते. हेच कारण आहे की,  आपल्याला ओरल हेल्थ आणि दातांची काळजी घ्यावी लागते. असं काही खाऊ नये ज्याने दात खराब होतील. चला जाणून घेऊ दात खराब होऊ नये म्हणून आपण काय काय खायला हवं.

आंबट कॅंडीज

ही हैराण करणारी बाब नाही की, कॅंडी तुमच्या तोंडासाठी फार नुकसानकारक आहे. पण त्यात आंबट कॅंडी जास्त घातक आहे. कारण त्यात जास्त अॅसिड असतं. ज्यामुळे तुमचे दात कठोर होतात. त्याशिवाय कॅंडी चघळल्याने ते दातांमध्ये चिकटून राहते. हेच कारण आहे की, दातांना कीड लागू शकते.

ब्रेड

पुढल्यावेळी बाजारातून ब्रेड आणताना चार वेळा विचार करा. कारण जेव्हा तुम्ही ब्रेड चावता तेव्हा तुमची लाळ स्टार्चला शुगरमध्ये तोडते. जेव्हा ब्रेड चावल्यावर तोंडात एक पेस्ट तयार होते तेव्हा ती दातांच्या मधे फसते. याने दातांना कीड लागते.

दारू

आपल्या सगळ्यांना माहीत आहे की, दारू पिणं किती नुकसानकारक आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, जेव्हा तुम्ही दारू पिता तेव्हा तुमचं तोंड कोरडं पडतं. तोंड कोरडं पडलं की, लाळ कमी तयार होते, लाळ ही दातांना निरोगी ठेवण्यासाठी गरजेची असते. लाळ अन्न दातांना चिकटू नये म्हणून मदत करते आणि अन्नाच्या कणांचा धुते. लाळेमुळे दातांनी कीड लागत नाही, इतर हिरड्यांचे आजारही दूर होतात. त्यामुळे दारू पिणं सोडा.

कोल्ड ड्रिंक्स

बाजारात मिळणारं कोल्ड ड्रिंक्स ज्याला कार्बोनेटेड ड्रिंक्स असंही म्हणतात. यात भरपूर प्रमाणात सोडाही असतो. जो आपल्या दातांना डॅमेज करतो. सोडा प्लाकला जास्त अॅसिड प्रोड्यूस करण्यास मदत करतो. जो इनामेटला खराब करण्यासाठी जबाबदार असतो.

बर्फ

सगळ्यांना वाटतं की, बर्फात तर केवळ पाणी असतं. त्यामुळे तो चावून खाल्ल्याने काही नुकसान होणार नाही. पण असं नाहीये. अमेरिकन डेंटल असोसिएशननुसार, कोणताही कठोर पदार्थ चावल्याने इनामेलला नुकसान पोहोचतं. दातांमध्ये यामुळे भेगा पडू शकतात. 
 

Web Title: Worst foods for teeth sour candies, bread, alcohol, you should know this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.