Diabetes च्या रूग्णांनी चुकूनही खाऊ नये या भाज्या. पडू शकतं महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 09:30 AM2023-05-12T09:30:32+5:302023-05-12T09:31:10+5:30
Diabetes Patient Should Not Eat Vegetables: डायबिटीसच्या रूग्णांना अनेक पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो. यात काही भाज्यांचाही समावेश आहे.
Diabetes Patient Should Not Eat Vegetables: डायबिटीस एक असा आजार आहे जो आयुष्यभर पिच्छा सोडत नाही. तेच डायबिटीसच्या रूग्णांना आपल्या आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागते. असं केलं नाही तर ब्लड शुगर लेव्हल अनियंत्रित होण्याचा धोका असतो. हेच कारण आहे की, डायबिटीसच्या रूग्णांना अनेक पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो. यात काही भाज्यांचाही समावेश आहे.
1) बटाटे
बटाट्याला भाज्यांचा राजा म्हटलं जातं. पण यात स्टार्च आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण फार जास्त असतं. याच कारणाने डायबिटीसच्या रूग्णांना बटाट्यापासून तयार पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो.
2) मका
मका खाण्याचे अनेक फायदे असले तरी डायबिटीसच्या रूग्णांसाठी याचं सेवन करणं घातक ठरू शकतं. अर्धा कप मक्यामध्येच साधारण 21 ग्राम कार्बोहायड्रेट आढळतं. जे आरोग्यासाठी फार नुकसानकारक आहे.
3) हिरवे वाटाणे
हिरव्या वाटाण्यांमध्ये कार्बोहाइड्रेट आणि स्टार्चचं प्रमाण फार जास्त असतं. त्यामुळे डायबिटीसच्या रूग्णांची याचं सेवन केलं तर पचन तंत्र बिघडतं. अशात शुगर असेल तर याचं सेवन करूच नये.
4) रताळे
रताळे एक चांगली भाजी आहे. पण डायबिटीसच्या रूग्णांसाठी हे विषासारखं आहे. कारण यात कार्बोहायड्रेट आणि बीटा केरोटीन भरपूर प्रमाणात असतं. याची टेस्टही गोड असते.