Weight loss tips: जेवताना तुम्हीही करत असाल 'या' चूका तर वजन वाढणं नक्की, वेळीच आवरा या सवयी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 04:48 PM2022-06-15T16:48:35+5:302022-06-15T16:53:22+5:30

आपण आपल्या आहारात चरबी आणि कार्बोहायड्रेट्सचा समावेश थोडा काळजीपूर्वक केला आणि काही खाण्याच्या सवयींमध्ये बदल केला तर कोणत्याही व्यायामाशिवाय आपण वजन कमी करू (Worst Eating Habits For weight gain) शकता.

wrong food eating habits can increase your weight follow these tips to avoid | Weight loss tips: जेवताना तुम्हीही करत असाल 'या' चूका तर वजन वाढणं नक्की, वेळीच आवरा या सवयी

Weight loss tips: जेवताना तुम्हीही करत असाल 'या' चूका तर वजन वाढणं नक्की, वेळीच आवरा या सवयी

Next

वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवायचे तर असते, पण अनेकांना त्यासाठी हार्ड वर्क करायचे नसते. कित्येकांना वजन कमी करायचं असतं पण वर्कआउट्सचा कंटाळा येतो किंवा विविध कारणांनी करता येत नाही. अशा परिस्थितीत वजन कमी करणं हे स्वप्नवत वाटतं. पण आम्ही तुम्हाला सांगतो की, जर आपण हार्ड वर्क न करता वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर ते प्रत्यक्षात शक्य आहे. यासाठी आपण खाण्याच्या सवयी सुधारू शकत असाल तर तुम्ही हे करू शकता. ExactDiteने दिलेल्या माहितीनुसार, आपण आपल्या आहारात चरबी आणि कार्बोहायड्रेट्सचा समावेश थोडा काळजीपूर्वक केला आणि काही खाण्याच्या सवयींमध्ये बदल केला तर कोणत्याही व्यायामाशिवाय आपण वजन कमी करू (Worst Eating Habits For weight gain) शकता.

गोडाची लालसा –
वास्तविक, जेव्हा आपण काहीतरी गोड खातो तेव्हा आपल्याला छान वाटते आणि आपण ते २ ऐवजी ४ खातो. यामुळे तुमची जेवणाची लालसा वाढते, त्यामुळे तुमच्या कंबरेचा आकारही वाढतो. जर तुम्ही गोड खाण्याची सवय बदलली तर तुमचे वजन आपोआप कमी होईल.

स्ट्रेस ईटिंग –
तणाव कमी करण्याच्या प्रयत्नात अनेक लोक स्ट्रेस ईटिंगच्या आहारी जातात आणि भूक लागलेली नसतानाही खात राहतात. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, ताणतणावात हेल्दी फूड्सऐवजी लोक फास्टफूड आणि अस्वास्थ्यकर पदार्थ जसे की आइस्क्रीम, कुकीज, चॉकलेट, चिप्स, फ्रेंच फ्राईज आणि पिझ्झा खातात. हे पदार्थ वजन वाढवण्याचे काम करतात. हे पदार्थ टाळल्यास आपण वजन झपाट्याने कमी करू शकतो.

निष्काळजीपणे खाणे –
अनेकदा कंटाळा येतो आणि मग काही करायचं नसतं, अशावेळी लोकांना खायला आवडते. बरेच लोक विशेषतः टीव्ही पाहताना, फोन कॉल इत्यादींमध्ये निष्काळजीपणे खात राहतात. वास्तविक, आपल्या बेफिकीर खाण्याच्या सवयींमुळे आपले वजन वाढते. आजच या सवयी सोडा.

फास्ट खाणं –
काही लोक चावल्या-चघळल्याशिवाय अन्न पटकन गिळतात आणि जेवणाचं काम पटकन फिन्निश झाल्याचं समजतात. वास्तविक, मेंदूला आपले पोट भरले आहे हे समजण्यासाठी 20 मिनिटे लागतात, पण काहीजण 5 मिनिटांत जेवतात, असे केल्याने पुन्हा पुन्हा भूक लागते.

नाश्ता न करणं –
बरेच लोक सकाळी लवकर काही खात नाहीत. असं करणं चुकीचं आहे, सकाळी वेळेत खाल्ल्याने आपले चयापचय सुधारते आणि आपली रक्तातील साखर सुरळीत राहते. वजन कमी करण्यासाठीदेखील ते आवश्यक आहे.

Web Title: wrong food eating habits can increase your weight follow these tips to avoid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.