जास्त प्रमाणात जांभया येतात? केवळ थकवा नाही हे असू शकतात कारणे!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 09:44 AM2018-11-03T09:44:37+5:302018-11-03T09:44:48+5:30
जांभई येणे तशी ही एक सामान्य बाब आहे. जांभईचा संबंध नेहमी झोप येणे किंवा थकवा जाणवणे याच्याशी जोडला जातो. कमी प्रमाणात जांभई याने गंभीर नाही.
जांभई येणे तशी ही एक सामान्य बाब आहे. जांभईचा संबंध नेहमी झोप येणे किंवा थकवा जाणवणे याच्याशी जोडला जातो. कमी प्रमाणात जांभई याने गंभीर नाही. पण जर हे प्रमाण जास्त असेल तर याची वेगवेगळी कारणे असू शकतात. मात्र जांभई येण्यामागे काही आजाराचे आणि शारिरीक समस्या वाढण्याचे संकेतही दिले जातात. म्हणूनच तुम्ही फारसे थकले नसाल तरीही जांभई येण्याचे प्रमाण वाढत असल्यास त्यामागे ही काही छुपी कारणं असण्याची शक्यता आहे.
थकवा किंवा झोप येत असल्यास जांभई येणे स्वाभाविक आहे. यामागील नेमके मेकॅनिझम ठाऊक नसले तरीही अशा वेळी जांभई येणे हे अगदीच नॉर्मल आहे. अपुर्या झोपेमुळे तुम्हांला वारंवार जांभई येऊ शकते. थकवा वाढल्याने मेंदूकडून आराम करण्याचा सल्ला दिला जातो. सध्याच्या तणावग्रस्त जीवनशैली हे अपुर्या झोपेचं कारण असू शकते. तसेच सेन्ट्रल स्लीप अॅप्निया, निद्रानाश यामुळे दिवसातही जांभई येण्याचे प्रमाण वाढू शकतं.
काही औषधांचा दुष्परिणाम
आरोग्य विषयक काही समस्या वगळता औषधांच्या परिणामामुळे देखील मरगळ किंवा सुस्ती येऊ शकते. यामुळे जांभया येण्याचे प्रमाण वाढते. अॅन्टी डीप्रेसंट, काही पेनकिलर यांमुळे जांभई येऊ शकते.
ब्रेन ट्युमर / स्ट्रोक
मेंदूच्या कार्यामध्ये बिघाड झाल्यास त्याचे संकेत दिले जातात परिणामी जांभई येते. जर्नल ऑफ न्युरोलॉजीच्या अहवालानुसार जांभई येणे हे मेंदूच्या कार्यामध्ये बिघाड असल्याचे लक्षण आहे. काही रुग्णांमध्ये जांभई येणे हे लक्षण त्यांच्या मेंदूतील नसांना झालेल्या प्रेशरमुळेही उद्भवते.
लिव्हरची समस्या
लिव्हर निकामी होण्याच्या अंतिम ट्प्प्यावर जांभया येण्याचे प्रमाण वाढते. थकव्यामुळेदेखील या आजारात जांभया येण्याचे प्रमाण वाढते.
वेसोवेगल रिअॅक्शन
या आजारामध्ये वेगस नर्व्हचे कार्य बिघडल्यामुळे होते. ह्र्द्याजवळ रक्तप्रवाह होतो. हे हृद्यविकाराच्या झटक्यामध्ये आढळते. अपुरी झोप, थकवा नसतानादेखील जांभई येणे हे हृद्याचे आरोग्य बिघडल्याचे लक्षण आहे.
एपिलप्सी
एपिलप्सी ही एक कंडीशन असून मेंदूच्या काही भागाचे कायमस्वरूपी नुकसान झाल्याने त्याची निर्मिती होते. त्यामुळे मेंदूकडून दिल्या जाणार्या संकेतांपैकी एक म्हणजे जांभई ! त्यामुळे चाचणी करून त्याचे निदान करणे अधिक फायदेशीर ठरते. प्रामुख्याने मेंदूचे कार्य मंदावल्याने हा जांभईचे प्रमाण वाढते.