हृदय निरोगी ठेवण्यासाठी पिवळ्या रंगाच्या फळांचा आणि भाज्यांचा आहारात करा समावेश!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 06:03 PM2022-07-16T18:03:19+5:302022-07-16T18:03:51+5:30

Benefits Yellow Foods For Heart: काही महत्वाच्या फळांचा आहारात समावेश केला पाहिजे. प्रसिद्ध डायटिशिअन डॉ. आयुष यादव यांच्यानुसार काही पिवळी फळं आणि भाज्या खाल्ल्याने हृदय अधिक मजबूत राहतं.

Yellow colour foods: Why you must include them in your diet | हृदय निरोगी ठेवण्यासाठी पिवळ्या रंगाच्या फळांचा आणि भाज्यांचा आहारात करा समावेश!

हृदय निरोगी ठेवण्यासाठी पिवळ्या रंगाच्या फळांचा आणि भाज्यांचा आहारात करा समावेश!

googlenewsNext

Benefits Yellow Foods For Heart: हृदय आपल्या शरीरातील फार महत्वाचा अवयव आहे. जन्म घेतल्यापासून ते मृत्यूपर्यंत हृदय धडधडत राहतं. त्यामुळे याची काळजी घेणंही फार गरजेचं आहे. जर हृदयाची काळजी घेतली नाही तर हार्ट अटॅक, कोरोनरी आर्टरी डिजीज आणि ट्रिपल वेसल डिजीजसारखे जीवघेणे आजार होऊ शकतात. त्यामुळे डेली डाएटमधून हृदयासाठी घातक पदार्थ बाहेर केले पाहिजे. तसेच काही महत्वाच्या फळांचा आहारात समावेश केला पाहिजे. प्रसिद्ध डायटिशिअन डॉ. आयुष यादव यांच्यानुसार काही पिवळी फळं आणि भाज्या खाल्ल्याने हृदय अधिक मजबूत राहतं.

आंबा - आंब्याचं नाव काढताच तोंडाला पाणी सुटतं. उन्हाळ्यात लोक आंबे खाण्याचा खूप आनंद घेतात. याचा गोडवा आणि टेस्ट दोन्हीही सर्वांना आवडणाऱ्या असतात. आंबे खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यातील एक महत्वाचा फायदा म्हणजे आंबे हृदयासाठी खूप फायदेशीर असतात.

लिंबू - लिंबूमध्येही अनेक औषधी गुण असतात. आयुर्वेदात तर याचे अनेक फायदे सांगितले आहेत. लिंबाचा रस शरीराला एनर्जी देतो. सोबतच यातील अॅंटी-ऑक्सिडेंट गुण वेगवेगळ्या प्रकारे फायदेशीर ठरतात. लिंबू हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासोबतच वजन कमी करण्यासही फायदेशीर असतं.

केळी - फायबर भरपूर प्रमाणात असलेलं फळ म्हणजे केळी. केळी पोटांच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठीही फायदेशीर आहे. तसेच योग्य प्रमाणात नियमित केळी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते आणि याने हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं.

अननस - अननसाचा गोडवा कुणालाही आवडतो. पण अनेकांना माहीत नाही की, यातील गुणांमुळे हार्ट अटॅकचा धोकाही कमी होतो. पण याचं जास्त प्रमाणात सेवनही करू नये. कारण याने ब्लड शुगर लेव्हल वाढण्याचा धोकाही असतो.

पिवळी ढोबळी मिरची - पिवळ्या ढोबळी मिरचीत फायबर, आयर्न आणि फोलेट भरपूर प्रमाणात असतं. याने शरीराला भरपूर एनर्जी मिळते आमणि सोबतच शरीरात रक्ताचीही कमतरता होत नाही. हृदया सुद्धा निरोगी राहतं.

Web Title: Yellow colour foods: Why you must include them in your diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.