शरीराच्या या अवयवांचा रंग पिवळा झाला तर वेळीच व्हा सावध, डायबिटीसचा इशारा तर नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 06:25 PM2022-08-02T18:25:21+5:302022-08-02T18:26:50+5:30

Diabetes Symptoms : ब्लड शुगर वाढली तर शरीर वेगवेगळे संकेत देतं. ज्यांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. असं मानलं जातं की, डायबिटीसचे संकेत आपल्या नखांवरही मिळतात. चला जाणून घेऊ काय आहे हा संकेत.

Yellow finger nails give type 2 diabetes symptoms warning sign kidney disease high cholesterol | शरीराच्या या अवयवांचा रंग पिवळा झाला तर वेळीच व्हा सावध, डायबिटीसचा इशारा तर नाही ना?

शरीराच्या या अवयवांचा रंग पिवळा झाला तर वेळीच व्हा सावध, डायबिटीसचा इशारा तर नाही ना?

Next

Diabetes Symptoms : डायबिटीसच्या रूग्णांचं आयुष्य काही सोपं नसतं, त्यांना आरोग्याबाबत खूप जास्त काळजी घ्यावी लागते. खासकरून या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं की, ब्लड शुगर लेव्हल वाढू नये. ब्लड शुगर वाढली तर शरीर वेगवेगळे संकेत देतं. ज्यांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. असं मानलं जातं की, डायबिटीसचे संकेत आपल्या नखांवरही मिळतात. चला जाणून घेऊ काय आहे हा संकेत.

हातांची नखं पिवळी होऊ लागली की, अनेक लोकांना या गोष्टीची भीती असते की, त्यांची ब्लड शुगर लेव्हल तर वाढली नाहीये ना. जास्तीत जास्त हेल्थ एक्सपर्ट हे मानतात की, पिवळ्या नखांचा मधुमेहासोबत थेट संबंध नाहीये आणि रिसर्चमधूनही हे समोर आलं आहे. नखांचा रंग पिवळा होणं हा शरीरातील दुसऱ्या समस्येचा संकेत असू शकतो. ज्यात बॅड कोलेस्ट्रॉल किंवा काविळीचा समावेश आहे.

किडनी डिजीजमुळे नखांचा रंग होतो पिवळा

सामान्यपणे हे बघण्यात आलं आहे की, डायबिटीसमुळे रूग्णांना किडनी डिजीजही होतात. ज्यानंतर एनीमिया आजार होणं नॉर्मल आहे. रक्ताच्या कमतरतेमुळे नखांचा रंग हलका बदलून पिवळा होऊ लागतो. पण असं फार कमी होतं. तेही तेव्हा जेव्हा ब्लड शुगर लेव्हल फार जास्त वाढते.

एनीमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता होणे, डायबिटीस दरम्यान असं होण्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. पण याचं मुख्य कारण ब्लड शुगर लेव्हल वाढणं, ब्लड वेलेल्समध्ये सूज किंवा ब्लड क्लॉटिंग आहे. अशा स्थितीत किडनीच्या नसांमध्ये मोठा बदल येऊ लागतो. जर किडनी व्यवस्थित असेल तर रेड ब्लड वेसेल्सचं प्रॉडक्शन योग्यप्रकारे होतं. आणि एरिथ्रोपियोटिन नावाचं हार्मोन हे बोन मॅरोसाठी फायदेशीर असतं. तेच किडनी डिजीजमध्ये या प्रोसेसमध्ये अडथळा येऊ लागतो. आपल्या किडनी रक्ताला योग्यप्रकारे फिल्टर करू शकत नाहीत.

नखं का पडतात पिवळे?

नखांचा नैसर्गिक रंग हा गुलाबी असतो. पण शरीरात काही समस्या झाल्या तर त्यांचा रंग पिवळा होऊ शकतो. असं सामान्यपणे तेव्हा होतं जेव्हा शरीरात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची कमी असते. तसेच याचं कारण सोरियासिस, थायरॉइड आणि हाय कोलेस्ट्रॉल असू शकतं.

Web Title: Yellow finger nails give type 2 diabetes symptoms warning sign kidney disease high cholesterol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.