Yellow Fungus : ब्लॅक आणि व्हाइटनंतर आता देशात Yellow Fungus ची पहिली केस, इतर दोन्ही फंगसपेक्षा जास्त घातक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 03:26 PM2021-05-24T15:26:02+5:302021-05-24T15:29:44+5:30

Yellow Fungus : ब्लॅंक फंगसने लोकांचे जीव जात असताना उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये यलो फंगसची पहिली केस समोर आली आहे.

Yellow Fungus : First case of yellow fungus more dangerous than black fungus and white fungus know-about-symptoms | Yellow Fungus : ब्लॅक आणि व्हाइटनंतर आता देशात Yellow Fungus ची पहिली केस, इतर दोन्ही फंगसपेक्षा जास्त घातक

Yellow Fungus : ब्लॅक आणि व्हाइटनंतर आता देशात Yellow Fungus ची पहिली केस, इतर दोन्ही फंगसपेक्षा जास्त घातक

Next

सध्या देशात कोविड-१९ ची दुसरी लाट आणि त्यानंतर ब्लॅक फंगस (Black Fungus) व नंतर व्हाइट फंगसने(White Fungus) लोक हैराण झाले आहेत. आता देशात यलो फंगसने (Yellow Fungus) डोकं वर काढलं आहे. ब्लॅंक फंगसने लोकांचे जीव जात असताना उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये यलो फंगसची पहिली केस समोर आली आहे. यलो फंगसने शिकार झालेल्या या रूग्णावर सध्या गाझियाबादमधील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

DNA वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार तज्ज्ञांनी या नव्या फंगसची लक्षणेही सांगितली आहेत. यलो फंगसच्या रूग्णाला सुस्ती, भूक कमी लागणे किंवा अजिबातच भूक न लागणे यासारखी सुरूवातीची लक्षणे दिसतात. सोबतच रूग्णाचं वजन कमी होऊ लागतं. तेच गंभीर स्थितीत जखमा कमी वेगाने ठीक होणे, कुपोषण, अवयव काम करणे बंद होणे अशाही स्थिती निर्माण होतात. याने ग्रस्त रूग्णाचे डोळे आतल्या बाजूला घुसतात. (हे पण वाचा : Black Fungus vs White Fungus: ब्लॅक आणि व्हाइट फंगसमध्ये काय फरक आहे? शरीराच्या कोणत्या अवयवांचं होतं याने नुकसान?)

इतर दोन्ही फंगसपेक्षा घातक

असे सांगितले जात आहे की यलो फंगस इतर दोन ब्लॅक आणि व्हाइट फंगसपेक्षा जास्त घातक आहे. कारण हा आजार शरीराच्या आत सुरू होतो आणि फार नंतर याची लक्षणे बाहेर दिसू लागतात. अशात लक्षणे दिसताच लगेच त्यावर उपचार घेतले गेले पाहिजे.

यलो फंगसची कारणे

इतर दोन फंगसप्रमाणे यलो फंगसचं संक्रमण होण्याचं कारणही अस्वच्छता आणि ओलावा आहे. त्यामुळे घरात - आजूबाजूला स्वच्छता ठेवा. बॅक्टेरिया आणि फंगसला विकसित होण्यापासून रोखण्यासाठी जेवढ्या लवकर शक्य असेल जुने खाद्य पदार्थ टाकून द्या. त्यासोबत घरात ओलावा असल्यानेही बॅक्टेरिया आणि फंगस वाढतो. 
 

Web Title: Yellow Fungus : First case of yellow fungus more dangerous than black fungus and white fungus know-about-symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.