Cholesterol वाढल्यावर डोळ्यांवर दिसतात हे संकेत, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 11:50 AM2022-08-01T11:50:14+5:302022-08-01T11:50:23+5:30
Yellow Lumps Around The Eyes:तशी तर कोलेस्ट्रॉल वाढल्याची माहिती ब्लड टेस्ट करूनही घेता येते, पण सुरूवातील शरीरावर काही संकेत दिसतात. जे समजणं फार गरजेचं आहे. नाही तर नंतर ते महागात पडू शकतं.
Yellow Lumps Around The Eyes: हाय कोलेस्ट्रॉल (High cholesterol) हे शरीरासाठी किती नुकसानकारक आहे याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, यामुळे हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस, हार्ट अटॅक, ट्रिपल वेसल डिजीज आणि कोरोनरी आर्टरी डिजीजसारखे खतरनाक आजार होऊ शकतात. याने तुमचा जीवही जाऊ शकतो. तशी तर कोलेस्ट्रॉल वाढल्याची माहिती ब्लड टेस्ट करूनही घेता येते, पण सुरूवातील शरीरावर काही संकेत दिसतात. जे समजणं फार गरजेचं आहे. नाही तर नंतर ते महागात पडू शकतं.
डोळ्यात दिसतात कोलेस्ट्रॉलचे संकेत
शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्याचे काही संकेत डोळ्यांवरही दिसू शकतात. जर तुमच्या डोळ्यांच्या आजूबाजूला पिवळ्या रंगाच्या गाठी किंवा डाग दिसत असतील तर हा कोलेस्ट्रॉल वाढल्याचा संकेत आहे.
जॅंथेलाज्माची शक्यता
डोळ्यांच्या आजूबाजूला पिवळ्या गाठी असतील तर ही एक मोठी समस्या असू शकते. जसे की, जॅंथेलाज्मा. भविष्यात यामुळे हायपोथायरायडिज्म किंवा लिव्हर डिजीजचा धोका निर्माण होऊ शकतो.
लगेच करा टेस्ट
डोळ्यांच्या आजूबाजूला कोलेस्ट्रॉलचं डिपॉझिट वरच्या आणि खालच्या पापण्यांसोबतच आतील कानांमध्ये होतं. याने त्वचेची मोठी समस्या होऊ शकते. जेव्हाही शरीरात अशी लक्षणं दिसतील तेव्हा याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांना दाखवा आणि लवकरात लवकर ब्लड टेस्ट करा.
जॅंथेलाज्माचे रिस्क फॅक्टर्स
जॅंथेलाज्मा किंवा डोळ्यांच्या आजूबाजूला कोलेस्ट्रॉल जमा झाल्याने त्या लोकांना जास्त नुकसान होतं ज्यांच्या शरीरातील आधीच खालील समस्या आहेत.
- लठ्ठपणा
- स्मोकिंग
- महिला
- हाय बीपीचे रूग्ण
- डायबिटीस रूग्ण
- ज्यांची लिपिड लेव्हल हाय असते
- 30 ते 50 वयोगटातील लोक