योगा : आधार शरीर व मनाचा !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2017 12:52 PM2017-05-26T12:52:52+5:302017-05-26T18:22:52+5:30
आज प्रत्येकाकडे भरपूर पैसा आहे, सर्व टेक्नॉलॉजीयुक्त साधने आहेत. मात्र मनाची शांती नाही.
Next
सध्याचे ‘मॉडर्न कल्चर’ हे अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त मानले जाते. सर्व सुख-सुविधा तंत्रज्ञानाच्या जोरावर मनुष्याला उपलब्ध झाल्या आहेत. मात्र एवढे असूनही इतर प्राण्यांच्या तुलनेने बुद्धीमान असलेला मनुष्य हा खरच सुखी, समाधानी व आनंदी आहे का?
आज प्रत्येकाकडे भरपूर पैसा आहे, सर्व टेक्नॉलॉजीयुक्त साधने आहेत. मात्र मनाची शांती नाही. मनुष्यांच्या गर्दीत असूनही एकटा असतो. त्यामुळे निराधार तसेच एकाकीपणा वाटतो. हळुहळु तणावग्रस्त होतो आणि नैराश्येच्या समस्येने ग्रासला जातो. विशेष म्हणजे या समस्येवर योग्यवेळी योग्य मार्गदर्शन आणि उपचार मिळत नसल्याने ही समस्या अधिकच बिकट होऊन लठ्ठपणा, ह्रदयविकार, मधुमेह, कॅन्सर आदी विकार जडले जातात.
या समस्यांना दूर ठेवण्यांचा सर्वात प्रभावी पर्याय म्हणजे ‘योगा’ होय. योगामुळे वजनात घट, सशक्त आणि लवचिक शरीर, तजेलदार त्वचा, शांत आणि प्रसन्न मन, उत्तम आरोग्य, यातली जी गोष्ट तुम्हाला हवी असते ती द्यायला योगा समर्थ आहे. योगाची मर्यादा ही फक्त योगासनांपूर्तीच मर्यादित आहे असा बºयाच वेळा लोकांचा गैरसमज होतो कारण त्याचे शारीरिक स्तरावर होणारे फायदे आपल्याला सहज लक्षात येतात. परंतू प्रत्यक्षात शरीर, मन आणि श्र्वासोच्छ्वास यांचा योगामुळे संयोग झाल्याने आपल्याला अगणित फायदे होतात. तुमचे मन, शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो.