महाराष्ट्रात होणार योग अभियान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 11:56 AM2018-02-23T11:56:34+5:302018-02-23T17:26:34+5:30

या अभियानात प्रशिक्षण आणि शिक्षण असे दोन्ही प्रकारांचा समावेश असणार आहे.

Yoga campaign to be organized in Maharashtra | महाराष्ट्रात होणार योग अभियान

महाराष्ट्रात होणार योग अभियान

googlenewsNext
रीर माध्यम खलू द्यर्म साद्यनम”म्हणजे कोणतेही सत्कार्य साधायचे असेल तर शरीर ठणठणीत असल्याशिवाय त्या कार्याचीपुर्ती होऊ शकत नाही. मनाचे स्वास्थ्य शरीरावर अवलंबून आहे. शरीर स्वस्थ असावे यासाठी आज योग महत्वाचा आहे, असे मत राष्ट्रीय योगा कमेटीचे सदस्य गौरांग चंदाराणा यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केले.वयाच्या तेरा वर्षांपासून गौरांग चंदाराणा हे योगा करत असून,त्यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनातील ही योग साधना आता जनकल्याणासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे.चार बड्या आंतरराष्ट्रीय बँकेंमध्ये ते उच्च पदावर काम करत होते तिथून स्वेच्छानिवृत्ती घेत पुढील आयुष्य हे योगाचे महत्व सामान्य जनतेला समजवण्यात घालवणार आहे. शासनाच्या योगा कमेटीवर
देशभरातून ज्या दहा मान्यवरांची नेमणूक झाली आहे त्यात गौरांग चंदाराणा यांचा देखील समावेश आहे. गौरांग पुढे सांगतात की, आज धकाधकीच्या जीवनात लोकांकडे बोलायला वेळ नाही त्यात व्यायाम आणि योगासाठी वेळ कुठून काढणार? आज योग शिकण्यासाठी परदेशातून लोकं इथे येतात आणि अजूनही आपण त्याबाबत हवे तेवढे उत्साही नाहीत.योग असा प्रकार आहे ज्यात तुमच्या उपलब्ध वेळेत योग साधना करून तुम्ही स्वस्थ राहू शकता, त्यासाठीच गौरांग यांनी संपूर्ण महाराष्ट्रात योग अभियान राबविण्याचे ठरवले आहे. याबद्दल ते सांगतात की, वेल झी आणि अभिष्टी या संस्थेअंतर्गत मार्च महिन्यासापासून महाराष्ट्रात योग अभियान राबवण्यात येईल. विशेष आणि उल्लेखनीय बाब म्हणजे महाराष्ट्रातील अति दुर्गम भागात हे अभियान राबवले जाणार आहे. त्यासाठी एकूण तीस योगा शिक्षकांची टीम तयार करण्यात आली आहे ज्यात २९
महिला आहेत.या अभियानात प्रशिक्षण आणि शिक्षण असे दोन्ही प्रकारांचा समावेश असणार आहे. म्हणजे वैयक्तिक जीवनासाठी देखील योगा शिकता येणार आहे आणि ज्यांना योग प्रशिक्षक व्हायचे आहे त्यांना देखील शिकवले जाणार आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सांगली, सोलापूर, धुळे, जळगाव, नागपूर, कोल्हापूर येथील अनेक जिल्ह्यांमधील शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था यांनी याबाबत उत्साह दाखवला आहे.महाराष्ट्रातील कोणतीही शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, योग संस्था देखील यासाठी त्यांना मोफत संपर्क करू शकता –गौरांग चंदाराणा ९८९२२४८४०८

Web Title: Yoga campaign to be organized in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.