रिकाम्या पोटी गुळाचं पाणी पिण्याचे होतात अनेक फायदे, जाणून घ्या एक्सपर्ट काय म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 09:47 AM2022-12-21T09:47:12+5:302022-12-21T09:47:28+5:30

योगा कोच अवनी तलसानिया सुद्धा  रोज सकाळी रिकाम्या पोटी गुळाच्या पाण्याचं सेवन करतात. त्या सल्ला देतात की, हा आइस्ड टी आणि लिंबू पाण्याला एक चांगला पर्याय आहे.

Yoga coach shared benefits of jaggery water drink having in empty stomach | रिकाम्या पोटी गुळाचं पाणी पिण्याचे होतात अनेक फायदे, जाणून घ्या एक्सपर्ट काय म्हणाल्या...

रिकाम्या पोटी गुळाचं पाणी पिण्याचे होतात अनेक फायदे, जाणून घ्या एक्सपर्ट काय म्हणाल्या...

googlenewsNext

गूळ एक नॅच्युरल स्वीटनर आहे. जो रंगासोबत वेगळी टेस्टही देतो. गूळ गरम असल्याने याचे हिवाळ्यात वेगवेगळे फायदे होतात. लोक या दिवसात गुळाचा चहा पितात. गुळामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, झिंक, फॉस्फोरस आणि तांब्यासारखे व्हिटॅमिन्स आणि खजिन असतात. अशात तुम्हाला हिवाळ्यात आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर गुळाचं सेवन करा.

आयुर्वेदानुसार, कोमट पाणी आणि त्यात गूळ मिक्स केला तर तुमच्या आरोग्यासाठी हे एक चांगल्या अॅंटीडोटचं काम करतं. याने नॅच्युरल पचन इंजाइम वाढतात, पचनाला गती मिळते आणि किडनीसंबंधी समस्याही दूर होण्यास मदत मिळू शकते.

योगा कोच अवनी तलसानिया सुद्धा  रोज सकाळी रिकाम्या पोटी गुळाच्या पाण्याचं सेवन करतात. त्या सल्ला देतात की, हा आइस्ड टी आणि लिंबू पाण्याला एक चांगला पर्याय आहे.

सर्दी कमी करण्यास फायदेशीर

गुळातील  पोषक तत्वांमुळे हिवाळ्यात  सर्दी, खोकला आणि फ्लूसारख्या समस्या दूर करतो. यात अने फेनोलिक तत्व असतात. जे ऑक्सिडेटिव तणावासोबत लढतात. शरीराला आराम देतात आणि प्रभावी पद्धतीने आरोग्य चांगलं ठेवतात.

बॉडी डिटॉक्स करतो

शरीरातून विषारी पदार्थ काढण्यासाठी गुळाचं पाणी फायदेशीर असतं. गुळामध्ये भरपूर फायबर असतात. जे आपलं पचन तंत्र सहजपणे स्वच्छ करण्यास मदत करतं. इतकंच नाही तर श्वसन तंत्र, फुप्फुसं, अन्न नलिका, पोट आणि आतड्याही याने स्वच्छ होतात.

वजन कमी करण्यास फायदेशीर

शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी गुळाचं पाणी तुमच्या फार कामात येऊ शकतं. यातील पोटॅशिअम शरीरातील इलेक्ट्रोलाइट आणि खनिजांचं प्रमाण संतुलित करण्यास मदत करतात. याने शरीरातील चरबी कमी होते.

सं तयार कराल गुळाचं पाणी

गूळ, चिया सीड्स, लिंबू, पुदीन्याची पाने घ्या. गूळ पाण्यात तोपर्यंत शिजवा जोपर्यंत त्याचं पाणी होत नाही. 10 ते 15 मिनिटे ते थंड करा. गुळाच्या उकडलेल्या पाण्यात 3 ते 4 लिंबाचा रस टाका. हे पुन्हा 30 मिनिटांसाठी थंड होऊ द्या. चांगल्या टेस्टसाठी चिया सीड्स आणि पुदीन्याची पाने टाका.

Web Title: Yoga coach shared benefits of jaggery water drink having in empty stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.