Yoga Day 2022 : चेहऱ्यावर ग्लो ते पोट कमी करण्यासाठी 'हे' आसन ठरतं फायदेशीर; दररोज करा 10 मिनिटे अन् पाहा बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 10:17 AM2022-06-18T10:17:56+5:302022-06-18T10:24:15+5:30

Yoga Day 2022 : 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस (International Yoga Day) साजरा केला जातो.

yoga day 2022 benefits of blow pose halasan glowing skin flat stomach | Yoga Day 2022 : चेहऱ्यावर ग्लो ते पोट कमी करण्यासाठी 'हे' आसन ठरतं फायदेशीर; दररोज करा 10 मिनिटे अन् पाहा बदल

Yoga Day 2022 : चेहऱ्यावर ग्लो ते पोट कमी करण्यासाठी 'हे' आसन ठरतं फायदेशीर; दररोज करा 10 मिनिटे अन् पाहा बदल

googlenewsNext

नवी दिल्ली - आपलं जीवन हे अधिक सुंदर बनवण्यासाठी योगासने खूप महत्त्वाची आहेत. रोज योगा केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्याला चांगला फायदा होतो. योगामध्ये अनेक आसन आहेत. जी शरीराच्या विविध भागांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी केली जातात. यामधील एक आसन म्हणजे हलासन. ज्याद्वारे एक नव्हे तर अनेक फायदे होतात. चेहऱ्यावर ग्लो आणण्यासोबतच पोट कमी करण्यासही मदत होते. हलासन केल्‍याने कोणते फायदे होतात आणि ते किती दिवस केले पाहिजे हे जाणून घेऊया...

21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस (International Yoga Day) साजरा केला जातो. प्रत्येक माणसाच्या जीवनात योगाचा समावेश करणे हा त्याचा उद्देश आहे. योगाच्या अनेक आसनांमध्ये हलासन असतं. ज्याचे अनेक फायदे आहेत. फोटो पाहून तुम्हाला ते नेमकं कसं करायचं हे समजले.

चेहऱ्याची चमक वाढवते

दररोज 10 मिनिटे हलासन केल्याने चेहऱ्यावर चमक येते. ब्लड सर्कुलेशन चांगले असणे हे त्यामागचे कारण आहे. हलासन केल्याने रक्ताचा फ्लो चांगला होतो. तसेच मुरुम आणि सुरकुत्यापासून आराम मिळतो. 

केसगळती थांबते

केसगळतीच्या समस्येपासूनही सुटका होते.

पाठदुखी निघून जाते

हलासन केल्याने पाठीचे आणि मणक्याचे स्नायू मजबूत होतात. यामुळे पाठदुखीमध्ये आराम मिळतो. जर तुम्हाला पाठदुखीचा त्रास होत असेल, तर हलासनासाठी तुमच्या रुटीनमधून काही मिनिटे काढा.

पोट कमी होण्यास मदत होते

हलासन केल्याने वजन वाढत नाही. यासोबतच पोटाची चरबीही हळूहळू कमी होते. जर तुम्ही अजून हलासन करत नसाल तर हळूहळू सराव करायला सुरुवात करा.

पोटाचे विकार दूर होतात

हलासनामुळे पोटाशी संबंधित विकार दूर होतात. ही योगासने केल्याने पोटाचे स्नायू सक्रिय होतात. त्यामुळे पोट, आतड्यांसह अनेक अवयवांना चालना मिळते. त्यामुळे पचनक्रिया बरोबर होते. गॅस, एसिडिटी आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

Web Title: yoga day 2022 benefits of blow pose halasan glowing skin flat stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.