लहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2018 11:04 AM2018-04-09T11:04:02+5:302018-04-09T16:35:16+5:30

लहान मुलांनी रोज योगा केल्यास त्यांचा मेंदू विकसित होण्यास मदत होते.त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते व मन शांत होते.

'Yoga' to increase the child's intellectual capacity! | लहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’!

लहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’!

Next
ला मुलगा अ‍ॅक्टीव्ह असावा म्हणून प्रत्येक पालकांचा आग्रह असतो. त्यासाठी विविध प्रकारच्या अ‍ॅक्टिव्हिटीज क्लासेसवरही भर दिला जातो.मात्र मुलांना लहान वयात योगा शिकविल्यास त्यांची बौद्धिक क्षमता विकसित होण्यास मदत होत असल्याचे संशोधनात स्पष्ट झाले आहे.  

* लहान मुलांनी रोज योगा केल्यास त्यांचा मेंदू विकसित होण्यास मदत होते.त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते व मन शांत होते. 

* लहान मुलांना त्राटकचाही खूपच फायदा होतो. मुलांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये एखादा बिंदू निश्चित करा व त्याकडे मुलांना एकाग्रतेने पाहण्यास सांगा. डोळे जड झाल्यावर डोळे मिटण्यास सांगा. 

* मुलांनी रोज अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी आणि झोपण्याआधी १० मिनिटे त्राटक करणे फायद्याचे आहे.यामुळे त्यांची एकाग्रता वाढून शाळेत शिकवत असतानाही मुलांचे लक्ष भरकटणार नाही. 

* मुलांच्या बौद्धिक व मानसिक विकासासाठी भ्रामरी प्राणायम आणि अनुलोम विलोम प्राणायम फायद्याचे आहे.    


Web Title: 'Yoga' to increase the child's intellectual capacity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.