Yoga Instructor नं करायला सांगितलं आसन; महिला थेट हॉस्पिटलला पोहचली, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 08:45 AM2021-10-05T08:45:11+5:302021-10-05T08:57:09+5:30

इंडिपेंडेंट वेबच्या रिपोर्टनुसार, पीडित महिलेचे नाव वांग असं आहे. ही घटना चीनच्या अन्होई प्रांतात घडली.

Yoga Instructor Allegedly Broke Woman’s Femur While Attempting Dragon Pose | Yoga Instructor नं करायला सांगितलं आसन; महिला थेट हॉस्पिटलला पोहचली, नेमकं काय घडलं?

Yoga Instructor नं करायला सांगितलं आसन; महिला थेट हॉस्पिटलला पोहचली, नेमकं काय घडलं?

Next
ठळक मुद्देयोग करताना काय झालं हे समजलं नाही. पायाची हालचाल बंद झाली होतीजेव्हा वेदना वाढल्या तेव्हा महिलेला हॉस्पिटलला उपचारासाठी नेण्यात आले. महिलेचं ऑपरेशन यशस्वी झालं असून आणखी १६ दिवस तिला डॉक्टरांच्या देखरेखीखाली हॉस्पिटलमध्येच राहावं लागणार आहे

बीजिंग – मागील काही वर्षापासून योगाबद्दल(Yoga) अनेकांच्या मनात खूप क्रेझ आहे. विशेषत: युवा वर्ग स्वत:ला फिट ठेवण्यासाठी योगा करायला लागले आहेत. योग करणं भलेही सोप्प वाटत असेल तर परंतु कधी कधी एका लहानशी चूकही महागात पडू शकते. चीनच्या एका महिलेसोबतही असेच काहीसे घडले आहे. महिला तिच्या गुरुच्या उपस्थितीत योग आसन करत होती तेव्हा तिचं हाड मोडलं. त्यानंतर तिला तातडीनं हॉस्पिटलला नेण्यात आलं.

Yoga Instructor नं लावला जोर

इंडिपेंडेंट वेबच्या रिपोर्टनुसार, पीडित महिलेचे नाव वांग असं आहे. ही घटना चीनच्या अन्होई प्रांतात घडली. वांग ही एका खासगी शिक्षकाकडे योगा शिकण्यासाठी जात होती. अलीकडेच महिलेच्या शिक्षिकेने त्यांना ड्रॅगन आसन(Dragon Pose) करण्यास सांगितले. परंतु जेव्हा महिलेने हे आसन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिची हाडं मोडली. टीचरनं महिलेच्या मांडीवर इतका दबाव टाकला त्यावेळी खूप वेदना झाल्या. त्यानंतर ही महिला तिचा पायदेखील हलवू शकत नव्हती.

हाड केव्हा मोडलं कळालं नाही

योग करताना काय झालं हे समजलं नाही. पायाची हालचाल बंद झाली होती. जेव्हा वेदना वाढल्या तेव्हा महिलेला हॉस्पिटलला उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी तपासले असता महिलेच्या हाडांमध्ये फ्रॅक्चर होते. डॉक्टरांनी महिलेला ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे वांग खूप घाबरल्या होत्या. परंतु ऑपरेशननंतरच तुमचा पाय ठीक होईल असं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर त्या ऑपरेशनसाठी तयार झाल्या.

Yoga Instructor नं उचलला उपचाराचा खर्च

महिलेचं ऑपरेशन यशस्वी झालं असून आणखी १६ दिवस तिला डॉक्टरांच्या देखरेखीखाली हॉस्पिटलमध्येच राहावं लागणार आहे. या काळात महिलेला चालणं-फिरणंही शक्य नाही. वांग यांच्या योगा टीचरनं तिच्यावरील उपचाराचा खर्च उचलला आहे. जवळपास ४ लाख महिलेच्या उपचारावर खर्च झालेत. सध्या हळूहळू या महिलेच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

त्यादिवशी नेमकं काय घडलं? समजलं नाही

वांग यांनी एका स्थानिक माध्यमांशी संवाद साधला तेव्हा म्हणाल्या की, माझी योगा टीचर खूप चांगली आहे. परंतु त्यादिवशी काय झालं ड्रॅगन पोज करायला सांगितली. टीचरने स्वत: सहजपणे ड्रॅगन पोज आसन केले. परंतु माझ्यासाठी ते शक्य होत नव्हतं. यावर टीचर माझ्या पायांवर दबाव टाकून आसन करण्यास भाग पाडलं. तेव्हा माझ्या शरीरातील हाड मोडल्याचं तिने सांगितले.

Web Title: Yoga Instructor Allegedly Broke Woman’s Femur While Attempting Dragon Pose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Yogaयोग